{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बॉक्स ऑफिस – विकी कौशल यांचा उरी हा १०० कोटींचा टप्पा पार करणारा २०१९ मधला पहिला हिंदी चित्रपट


कौतुकाची बाब म्हणजे या ऍक्शन थरारपटाची दुसऱ्या वीकेंडची कमाई पहिल्या वीकेंड पेक्षा जास्त होती.

Mayur Lookhar

विकी कौशल यांचा उरी हा २०१९ मधला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

रु२८ कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या उरीने आतापर्यंत भारतात रु१०८.४९ कोटींची कमाई केली आहे.

सर्वात आश्चर्याची आणि कौतुकास्पद बाब म्हणजे उरीने पहिल्या वीकेंडपेक्षा दुसऱ्या वीकेंडमध्ये जास्त कमाई केली. उरीची पहिल्या वीकेंड ची कमाई रु३५ कोटी असून चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये रु३७.२५ कोटींची कमाई केली.

उरीने दुसऱ्या शुक्रवारी रु७.७५ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी प्रत्येकी रु१३ कोटी आणि रु१६.२५ कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपट इतका का चालतोय यावर चित्रपट व्यवसाय विश्लेषक विनोद मिराणी  म्हणाले, "कदाचित राष्ट्रवाद हेच उत्तर आहे. आजकाल देशप्रेम, राष्ट्रवाद ह्या विषयावरील चित्रपट हिट होत आहेत. या अगोदर रिलीज झालेले राझी (२०१८), परमाणू(२०१८) सुद्धा हिट झाले होते."

उरी हा विकी कौशल चा प्रमुख अभिनेता म्हणून रु१०० कोटी कमावलेला पहिलाच चित्रपट आहे. कौशलने या अगोदर संजू (२०१८) मध्ये साहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती. संजूने भारतात रु३३४ कोटींची कमाई केली होती.

"जेव्हा तुम्हाला जाहिराती मिळू लागतात तेव्हा तो अभिनेता लोकप्रिय व्हायला लागलाय असे समजावे," असं मिराणी म्हणाले.

त्यालाच जोडून ते पुढे म्हणाले की "याची देखील नोंद घ्यायला हवी की विकी कौशल ने संजू आणि इतर चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल करू शकले नाहीत अश्या सर्वच चित्रपटांमध्ये छान अभिनय केला होता. त्यामुळे उरीच्या यशाचं अर्धे श्रेय लेखक-दिग्दर्शक आदित्य धारला सुद्धा द्यायला हवे. चित्रपटाचा आशय आणि त्याची मांडणी हे फारच महत्वाचे असते."

विकी कौशल ने ट्विटर वरून सर्व चाहत्यांचे आभार मानले. "शेवटी तुमचे प्रेम सर्वात महत्वाचे. उरी – द सर्जिकल स्ट्राईक तुम्ही सर्व प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकारल्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो."

चित्रपटात अजून एक महत्वाची भूमिका करणाऱ्या यामी गौतम यांना सुद्धा खूपच आनंद झाला. "चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतोय ते पाहून मी खूपच आनंदी आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमची मी खूप खूप आभारी आहे. सर्वानीच या चित्रपटासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. चित्रपटाच्या आशयावर आणि आमच्यासारख्या कलाकारांवर विश्वास ठेवणारे रॉनी स्क्रूवाला सारखे निर्माते लाभणे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. माझी २०१९ची सुरुवात इतकी छान झालेय याचा मला खूप आनंद आहे आणि मी भविष्यातसुद्धा प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहीन."

उरी भारतात २,२०० स्क्रीन्स वर रिलीज झाला होता. उरीने सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्स पासून रु१४ कोटी कमवले. उरीला म्युसिक राइट्स साठी रु२ कोटी झी कडून मिळाले.

उरी इथे आर्मी कॅम्प वर अतिरेक्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून अतिकरेक्यांचा खात्मा केला होता. त्याच घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

उरी बरोबर रिलीज झालेला अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर ने दुसऱ्या आठवड्यात रु३.१० कोटी कमवले.

प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या विजय रत्नाकर गुट्टे यांचा हा चित्रपट मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान काळातले मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर ने भारतात पहिल्या आठवड्यात रु२१.८६ कोटींची कमाई केली होती.

रु३० कोटीच्या बजेटमध्ये बनलेला दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर भारतभर १,२०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता.

सर्वांच्या टिकेच्या धनी पडलेल्या या चित्रपटात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर अक्षय खन्ना यांनी संजय बारूची भूमिका साकारली होती.

Related topics