News Hindi

मणिकर्णिका चे निर्माते कमल जैन यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी खोटी – कंगना रनौत


गेल्या काही दिवसांपासून जैन यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे असे काही रिपोर्ट्स येत होते.

Keyur Seta

कंगना रनौत च्या मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना गेल्या शनिवारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. स्पॉटबॉय.कॉम मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार जैन यांना पॅरॅलिटिक स्ट्रोक आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना आय सी यू मध्ये व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे, असेसुद्धा रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

चित्रपटाच्या प्रचारकांनी मात्र हे सर्व रिपोर्ट्स खोटे असल्याचं म्हटलं आहे. जैन यांना घसा आणि फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की त्यांना काही न्यूरो प्रॉब्लेम्स आहेत.

पक्षाघाताच्या झटक्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू निकामी झाली होती. आता त्यांची तब्येत हळूहळू ठीक होत आहे. ते फक्त काहीच वेळासाठी आय सी यु मध्ये होते, असे चित्रपटाच्या प्रचारकांनी सिनेस्तानला सांगितले.

आम्ही हॉस्पिटल शी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण हॉस्पिटलकडून आम्हाला काही प्रतिक्रिया मिळाली नाही.

एका ऑफिशिअल स्टेटमेंट मध्ये कंगना रनौत ने म्हटले, "जैन यांची तब्येत आता ठीक आहे. हे सर्व रिपोर्ट्स दिशाभूल करणारे होते. गेल्या आठवड्यात ते आजारी पडले पण आता हळूहळू त्यांची तब्येत पुर्वपदावर येत आहे. मी त्यांच्याशी दररोज कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कृपय अफवांना उत्तेजन देऊ नका."

चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी देखील म्हटले की "जैन यांना पॅरालिटिक स्ट्रोक आला नसून त्यांच्या फुफ्फुसात अन्न अडकल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असून आता त्यांची तब्येत ठीक आहे."

मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी हा राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट असून २५ जानेवारीला चित्रपट रिलीज होईल.

Related topics