{ Page-Title / Story-Title }

News Marathi

भाई – व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध ट्रेलर मध्ये पु ल देशपांडेंचे क्रीएटीव्ह स्ट्रगल


महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई – व्यक्ती की वल्लीच्या दुसऱ्या भागात पु ल देशपांडेंच्या कथांमागचा प्रवास, त्यांचे राजकीय विचार आणि सृजनात्मक प्रक्रियेमागचे द्वंद्व याचा वेध घेण्यात आला आहे.

Keyur Seta

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडेंची जीवनकथा एका चित्रपटात सांगणे अशक्यच. आता भाई – व्यक्ती की वल्ली च्या दुसऱ्या भागात पु ल देशपांडेंचा मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजकारण अश्या साऱ्या क्षेत्रांमधले योगदानावावर प्रकाश टाकला आहे.

४ जानेवारीला रिलीज झालेल्या पहिल्या भागात पु ल देशपांडेंचा एक लहान मुलगा ते प्रसिद्ध लेखक हा प्रवास दाखवला आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा मराठी रंगभूमी, स्टँडअप कॉमेडी तसेच मराठी सिनेमा अश्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.

लेखकाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी जसे रायटर्स ब्लॉक, क्रिएटिव्ह आणि कमर्शिअल सक्सेस यामधले योग्य बॅलेन्स अश्या गोष्टींचा सामना देशपांडेंना करावा लागला. हा स्ट्रगल सागर देशमुख यांनी चांगला दाखवला आहे.

चित्रपटात वृद्धापकाळातील पु लं ची भूमिका दिग्गज रंगकर्मी आणि अभिनेते विजय केंकरे साकारणार आहेत.

पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातसुद्धा मराठी साहित्यातले आणि राजकारणातले काही दिग्गज नावांचा समावेश आहे. ट्रेलरमध्ये समाजसेवक बाबा आमटे सुद्धा दिसतात.

अश्या काही समाजसुधारकांच्या सान्निध्यात राहिल्याने पु ल देशपांडेंना काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात मराठी साहित्याला एक वेगळं वळण देणारे पु लं च्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत. परंतू ट्रेलर एकदम सिम्पल असून नावीन्य नाही आहे.

भाई – व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला रिलीज होईल.

 

Related topics