News Hindi Marathi

ठाकरे चित्रपटातील क्लब मिक्स थीम ट्रॅक मध्ये नवाझुद्दीन सिद्दिकींची डरकाळी

Read in: English


चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक इंटरेस्टिंग प्रमोशनल ट्रॅक रिलीज केले आहे.

Keyur Seta

नवाझुद्दीन सिद्दीकीने गेल्याच वर्षी सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यवर बेतलेला मंटो (२०१८) हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटात एक प्रमोशनल रॅप गाणे होते, रॅप आणि मध्ये पेरलेले मंटोचे संवाद अशी काहीशी त्या गाण्याची रचना होती.

आता नवाझुद्दीन सिद्दीकी ठाकरे चित्रपटात बाळ ठाकरेंची भूमिका करत आहेत आणि आता या चित्रपटाचे निर्माते सुद्धा क्लब मिक्स नावाचे एक थीम ट्रॅक घेऊन आले आहेत. यात सुद्धा सिद्दिकींचे डायलॉग्स आहेत.

सिद्दिकींचे पावरफुल डायलॉग्स आणि संदीप शिरोडकर यांचे अक्षरशः झिंगायला लावणारे संगीत यामुळे हे ट्रॅक पुन्हा पुन्हा ऐकूसे वाटते.

नवाझुद्दीन सिद्दिकींच्या आवाजात बाळासाहेबांच्या आवाजाइतकी जरब नसली तरी या ट्रकमध्ये त्यांचा आवाज अगदी परफेक्ट शोभतो.

गाण्यातील दृश्यांमध्ये बाळासाहेबांचा एक नवखे राजकारणी ते महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल राजकीय व्यक्तिमत्व असा प्रवास दाखवला आहे. व्हिज्युअल्स गाण्याला परफेक्ट मॅच करतात.

अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेला ठाकरे हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे, दोन्ही व्हर्जन्स एकाच दिवशी म्हणजे २५ जानेवारीला रिलीज होतील.

कंगना रानौतचा राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यावर बनलेला बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट मणिकर्णिका क्वीन ऑफ झाँसी सुद्धा २५ जानेवारीलाच रिलीज होणार आहे.

गाणे खाली पहा.

Related topics