News Hindi

२२ यार्डस ट्रेलर – बरून सोबती यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आपल्याला क्रिकेटच्या व्यावसाईक जगात घेऊन जातो


दिग्दर्शक मिताली घोषाल यांच्या चित्रपटात यशाच्या उत्तुंग शिखरावरून खाली कोसळल्यानंतर पुन्हा शिखर सर करण्याच्या जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या स्पोर्ट्स एजंटची कथा दाखवली आहे.

Keyur Seta

क्रिकेटवर बेतलेले काही चित्रपट या आधीही हिंदी सिनेमात आले आहेत, लगान (२००१) आणि इक्बाल (२००५) हे त्यातलीच काही उत्तम उदाहरणे.

जन्नत (२००८), इन्साईड एज (२०१७) यासारखे काही क्रिकेटमधल्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारे चित्रपट आणि वेब-सिरीज देखील आले आहेत.

स्पोर्ट्स जर्नालिस्ट असलेल्या मिताली घोषाल यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात या दोन्ही थीम्स एकत्र केल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आपली आशा नक्कीच उंचावतो.

क्रिकेटचा शौकीन (बरून सोबती) एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी चालवतो. खेळाडूंच्या जाहिराती, त्यांचे मार्केटिंग डील्स, स्पॉन्सरशीप डील्स यासारख्या गोष्टी तो हाताळतो.अत्यंत सुखात आयुष्य जगत असताना अचानक एक दिवस त्याने केलेल्या सर्व कुकर्मांचा कच्चा चिट्ठा मीडियाच्या हाती लागतो आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याच्या जिद्दीने तो एका टॅलेंटेड मुलाला (अमर्त्य रे ला) ट्रेन करायचं ठरवतो.

युनिक कथानकामुळे चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता आणखी वाढते. ट्रेलर पाहून असे वाटते की निर्मात्यांनी क्रिकेटच्या व्यावसाईक जगात बंद दरवाज्यामागे काय घडते याचा सखोल अभ्यास केला आहे.

ट्रेलरमध्ये सर्व कथानक रिव्हील करण्याचा मोह टाळायला हवा होता असे मात्र नक्कीच वाटते.

तू ही मेरा संडे चित्रपटा नंतर या चित्रपटात बरून सोबती यांनी धूर्त स्पोर्ट्स एजंटची भूमिका उत्तम निभावले असे वाटते. बाल कलाकार रेने देखील चांगले काम केले आहे असे ट्रेलर पाहून वाटते.

चित्रपटात दिग्गज अभिनेते रजित कपूर एका कोचच्या महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. २२ यार्डस २२ फेब्रुवारीला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics