News Marathi

'रंग माळियेला' गाण्यातून आनंदी गोपाळचा छोट्या मुली पासून विद्यार्थिनी पर्यंतचा प्रवास


भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांची कथा या चित्रपटात सांगितली आहे.

Keyur Seta

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांची कथा आनंदी गोपाळ या चित्रपटात सांगितली आहे.

चित्रपटाचा टीजर पाहून असे लक्षात येते की आनंदी जोशी यांचे पती गोपाळ जोशी हे चित्रपटाचे प्रमुख पात्रं आहेत. ललित प्रभाकर यांनी गोपाळ जोशींची भूमिका केली आहे.

'रंग माळियेला' गाण्यात आनंदीच्या लग्नाबरोबरच इतरही काही महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत.

आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर गोपाळ जोशी आनंदी या बाल वधूशी विवाह करतात. गोपाळ जोशींच्या क्रांतिकारक विचारांमुळे मुलीचे आईवडील त्यांचे लग्न लावून देण्याबाबत थोडे साशंक असतात परंतू शेवटी ते दोघांचं लग्न लावून देतात.

गोपाळ यांची फक्त एकच अट असते की लग्नानंतर आनंदीने शिक्षण घ्यावे. आनंदीच्या शिक्षणाबद्दल ते इतके आग्रही असतात की ते एकदा आनंदीला तिच्या माहेरी सोडून येतात कारण आनंदी मन लावून शिकत नसते.

यशाच्या छोट्या छोट्या पायऱ्या सर करत आनंदी जोशी शेवटी डॉक्टर बनतात. आनंदी जोशी त्यांच्या पारंपरिक पोषाखाबरोबर मोजे आणि बूट घालून बाहेर पडतात तो सीन जणू जुन्या चालीरीतींविरुद्ध मूकक्रांतीचा आरंभच आहे असे वाटते.

मराठी लग्नसमारंभात गायले जाणारे हे पारंपरिक गीत आहे. वैभव जोशी यांचे शब्द आणि संगीतकार ह्रिषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत आपल्याला १९व्या शतकात घेऊन जाते. केतकी माटेगावकर यांचा आवाज सुखावणारा आहे, त्यांना शरयू दातेची योग्य साथ लाभली आहे.

गाण्यामध्ये दिसणारे प्रोडक्शन डिजाइन सुद्धा आपले लक्ष वेधून घेते. या सर्वच गोष्टींमुळे चित्रपटाकडून आता अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. आनंदी गोपाळ १५ फेब्रुवारीला रिलीज होईल.

गाणे खाली पहा.

Related topics