{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बॉक्स ऑफिस: केदारनाथ ने दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसात कमवले रु११.५० कोटी 


सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या केदारनाथ ने आतापर्यंत संपूर्ण भारतात रु५३.५० कोटी कमावले आहेत.

Mayur Lookhar

अभिषेक कपूर यांचे दिग्दर्शन असलेल्या केदारनाथ ची बॉक्स ऑफिस वर यशस्वी घोडदौड चालूच आहे.

बॉक्सऑफिसइंडिया.कॉम या वेबसाईटनुसार सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात पहिल्या ३ दिवसात ११.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

केदारनाथ रिलीज झाला तेव्हा त्याने पहिल्या ३ दिवसात २२.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीच्या ३ दिवसाच्या कमाईची तुलना करता केदारनाथच्या दुसऱ्या आठवड्याच्या कमाईत ५५% टक्क्यांची घसरण झाली आहे.

केदारनाथ ने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी रु२.५० कोटी, शनिवारी रु३.७५ कोटी आणि रविवारी रु५.३५ कोटी कमावले. आरएसवीपी यांच्या निर्मीतीखाली बनलेला केदारनाथ १,८०० स्क्रीन्स वर रिलीज झाला होता. रु६० कोटी बजेट असलेल्या केदारनाथ ने आतापर्यंत भारतात रु५३.५० कोटी कमावले आहेत.

केदारनाथमध्ये आलेल्या २०१३ च्या महापुराच्या धर्तीवर बनलेली ही एक ब्राह्मण युवती मुकू (सारा) आणि मुस्लिम युवक मन्सूर (सुशांत) यांची प्रेमकहाणी आहे.

रोबो २.० ने तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसात रु६ कोटी कमवले. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जन ने भारतात आतापर्यंत रु१८१ कोटीची कमाई केली आहे.

लायका यांची निर्मिती असलेला आणि शंकरने दिग्दर्शित केलेला हा तमिळ चित्रपट भारतात ७,५०० (त्यातले ४,५०० हिंदी डब व्हर्जनसाठी) स्क्रीन्स वर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे एकूण बजेट रु५४३ कोटी इतके होते.

ह्या आठवड्यात हॉलीवूडचे अक्वामान आणि स्पायडरमॅन: इंटू द स्पायडरवर्स हे दोन सुपरहिरो चित्रपट रिलीज झाले. भारतात ८०० स्क्रीन्स वर रिलीज झालेल्या अक्वामान ने रविवारपर्यंत रु२४ कोटी कमाई केली तर स्पायडरमॅन: इंटू द स्पायडरवर्स ने पहिल्या तीन दिवसात फक्त रु३.८० कोटी कमवले.

Related topics