{ Page-Title / Story-Title }

News Marathi

अनिकेत विश्वासरावचा ह्रिदयात समथिंग समथिंग ह्या चित्रपटातील सहकलाकार स्नेहा चव्हाणशी विवाह संपन्न


वर्ष २०१८ ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांचा साखरपुडा झाला होता.

Keyur Seta

प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा विवाह १० डिसेंबरला पुण्यात खासगी समारंभात पार पडला.

वर्ष २०१८ ऑगस्ट मध्ये दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. विश्वासराव आणि चव्हाण ह्यांच्या कुटुंबाचे मैत्रीचे संबंध आहेत. दोघांनीही आपापल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लग्नाचे फोटो शेर केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#astartwithnoend ❤ #day3 #theday Picture credits :- @wedding_wings_photography

A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on

फोटोंच्या शीर्षकावरून तरी असे समजते कि हळदी आणि मेहंदी चे सोहळे ८ आणि ९ तारखेला पार पडले.

ह्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ह्रिदयात समथिंग समथिंग ह्या चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले होते.

फक्त लढा म्हणा (२०११), नो एन्ट्री: पुढे धोका आहे (२०१२), तेंडुलकर आऊट (२०१३), पोश्टर बॉईज (२०१४), पोश्टर गर्ल (२०१६), बघतोस काय मुजरा कर (२०१७) आणि मस्का (२०१८) ह्या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयासाठी विश्वासराव प्रसिद्ध आहेत.

लाल इश्क (२०१६), नागपूर अधिवेशन: एक सहल (२०१६) ह्या चित्रपटांमध्ये स्नेहा चव्हाण ने अभिनय केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunshine 🌞 #day2 #haldi #astartwithnoend @wedding_wings_photography

A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on

 

Related topics