{ Page-Title / Story-Title }

Article Hindi

रब ने बना दी जोडी चित्रपटाचे दशकपूर्ती: अनुष्का शर्मांना इंडस्ट्री मध्ये १० वर्षे पूर्ण केली ह्याचा आनंद


चित्रपटसृष्टीतील आपल्या १० वर्ष्यांच्या अनुभवाबद्दल अनुष्काने आपले मनोगत व्यक्त केले.

Keyur Seta

कोणताही फिल्मी वारसा नसताना १० वर्ष्यापूर्वी एका तरुणीने यश राज फिल्म्सच्या बॅनर खाली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. आदित्य चोपडाने दिग्दर्शित केलेल्या रब ने बना दी जोडी (२००८) ह्या आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने शाह रुख खान बरोबर काम केलं.

ह्या चित्रपटामध्ये अनुष्का शर्माने तानी हा रोल केला होता. एका दुःखद घटनेमुळे तानीला अमृतसर मध्ये राहणाऱ्या सुरिंदर साहनी (खान) ह्या साध्याभोळ्या लाजाळू पुरुषाबरोबर लग्न कराव लागतं.

तानीचं ह्रिदयपरिवर्तन करून साहनी तिला कसा आपल्या प्रेमात पाडतो हि चित्रपटाची कथा आहे.

रब ने बना दी जोडी च्या दशकपुर्ती (१२ डिसेंबर २००८) बरोबरच आज अनुष्का शर्मा ने देखील चित्रपटसृष्टीमध्ये आपली १० वर्षे पूर्ण केली.

झिरो चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अनुष्का म्हणाल्या, "चित्रपटाची १० वर्षे पूर्ण झाली ह्याचा मला खूपच आनंद आहे. मागे वळून पाहताना मी माझ्या आयुष्याबद्दल आनंदी आणि समाधानी आहे. ज्या लोकांबरोबर काम केला त्या सर्वांकडून खूप काही शिकायला मिळाले. मी त्यासाठी नेहमीच ऋणी राहीन."

झिरो ह्या चित्रपटातदेखील अनुष्का शाह रुख खान बरोबर काम करत आहेत. आणि हा एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल असं तिला वाटतं.

अनुष्का शर्मा, शाह रुख आणि कतरीना कैफ ह्या त्रयीने यश चोपडां च्या जब तक है जान (२०१२) ह्या चित्रपटात काम केले होते.

अनुष्का पुढे म्हणाल्या कि त्यांना नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारायला आवडतात. "स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जाणारं पात्र पडद्यावर रंगवणं सोपं असतं त्यामुळेच मला माझ्या व्यक्तिमत्वाच्या अगदी विपरीत स्वभाव असणारी पात्र रंगवणं जास्त भावतं. आणि ह्या वर्षी मला हेच करायला मिळालं.

"हे वर्ष माझ्यासाठी माझ्या कारकिर्दीतील सगळ्यात कठीण वर्ष होतं. परी (२०१८), सुई धागा: मेड इन इंडिया (२०१८) आणि झिरो (२०१८) हे चित्रपट करताना मला अभिनेत्री म्हणून सगळ्यात जास्त मेहनत करावी लागली. आणि जर का तुम्ही हे आव्हान उत्तमरीत्या निभावलं तर त्याचा आनंद काही औरच असतो."

झिरो ह्या चित्रपटामध्ये अनुष्का सेरेब्रल पालसि झालेल्या मुलीचा रोल करत आहेत.

चित्रपटसृष्टीमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर अनुष्काने NH10 (२०१५) ह्या चित्रपटाची निर्मिती करून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनुक्रमे फिलौरी (२०१७), परी (२०१८) ह्या चित्रपटांची निर्मिती केली.

अनुष्का आतापर्यंत बनवलेल्या चित्रपटांमुळे खुश आहेत: "मी जेव्हा माझं प्रोडक्शन हाऊस सुरु केला तेव्हा मी खूपच तरुण होती आणि मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर आतापर्यंत जे मिळवलय त्याबद्दल मी स्वतःलाच दाद देते. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी माझ्या डोक्यावर कोणत्याच प्रसिद्ध व्यक्तीचा हात नव्हता. मी आणि माझा भाऊ फक्त आम्ही दोघांनी मिळूनच हे प्रोडक्शन हाऊस सुरु केलय."

Related topics