{ Page-Title / Story-Title }

News Hindi

पंकज त्रिपाठी ८३ चित्रपटाच्या टीम मध्ये सामील, मॅनेजर मानसिंग यांची भूमिका करणार


रणवीर सिंग, जीवा, चिराग पाटील, एमी विर्क यांच्याबरोबर आता पंकज त्रिपाठी यांचा सुद्धा ८३ मध्ये समावेश झाला आहे.

Shriram Iyengar

महत्वाच्या काही मेम्बर्सची निवड झाल्यानंतर कबीर खान यांच्या ८३ मध्ये आता मॅनेजरची सुद्धा निवड झाली आहे.

पंकज त्रिपाठी मानसिंग नावाच्या मॅनेजरची भूमिका करणार आहेत.

निर्मात्यांनी त्रिपाठींचा फोटो शेर करून या बातमीला दुजोरा दिला.

१० एप्रिल २०२० ला रिलीज होणाऱ्या ८३ मध्ये रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका आहे.

बातमीला दुजोरा देत पंकज त्रिपाठी म्हणाले, "कबीर खान हे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आम्ही दोन-तीन वेळा भेटलोय पण एकत्र काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. एक दिवस त्यांनी मला ८३ ची कथा ऐकवली आणि एक क्षणी मी भावुक झालो."

पी आर मानसिंग यांचा १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय टीमच्या यशामागे खूप महत्वाचा वाटा होता. ते फक्त कोच नाही तर भारतीय टीमचे प्रवक्ता म्हणून काम करत होते. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था पाहणे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, या सारख्या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले.

८३ची निर्मिती कबीर खान, मधू मेन्टेना, विष्णू इंदोरी यांनी केली आहे. सर्व कलाकार बलविंदर सिंग संधु, जे स्वतः विश्वविजेत्या संघाचे भाग होते, त्यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत.

Related topics