{ Page-Title / Story-Title }

News Marathi

फिल्म पोस्टर – आयफोन वर शूट होणाऱ्या पॉंडिचेरी चित्रपटात सई ताम्हणकर नॅच्युरल लुक मध्ये


सचिन कुंडलकर दिग्दर्शित पॉंडिचेरी मध्ये अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर यांच्यासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

Our Correspondent

१ फेब्रुवारीपासून सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी यांनी पॉंडिचेरी चित्रपटाची शूटिंग सुरु केली.

निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करून पॉंडिचेरीतल्या शेड्युलची सुरुवात केली.

पोस्टरवर सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी दिसत आहेत. चित्रपटाची टॅगलाईन सुद्धा इंटरेस्टिंग आहे. दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. पोस्टरवरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावता येत नाही.

आपल्याला एवढीच माहिती मिळाली आहे की दिग्दर्शक सचिन कुंडलकर हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर शूट करणार आहेत.

आयफोनवर शूट होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे असं ताम्हणकर म्हणाल्या. सई ताम्हणकरला आपण नुकतेच डेट विथ सई या वेब-सिरीज मध्ये पहिले होते.

पॉंडिचेरी मध्ये अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. तन्मय कुलकर्णी, भूपेंद्र सिंग जदावत आणि गौरव घाटणेकर यांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.

चित्रपटात सई ताम्हणकर नॅच्युरल लुक मध्ये दिसतील. चित्रपटात काम करण्याचा अनुभवाविषयी त्या म्हणाल्या, "मला तुम्ही चित्रपटात नॅच्युरल लुक मध्ये पाहाल. विना मेकअप आणि विखुरलेले केस या लुकमध्ये मी या चित्रपटात दिसणार आहे. मी ही प्रोसेस एन्जॉय करत आहे. जेव्हा तुम्ही सर्वप्रथम अभिनय कार्यशाळेत जाता तेव्हा जसे वाटते अगदी तसा अनुभव आहे."

आपल्या कारकिर्दीत प्रथमच असे नवीन काहीतरी करायला मिळाले याचा त्यांना आनंद आहे. "माझ्या मते प्रत्येक अभिनेत्रीला अशी एकतरी भूमिका मिळायला हवी जी तिला तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन येईल. म्हणून शूटिंग सुरु होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे," असं ताम्हणकर म्हणाल्या.

साई ताम्हणकर ने कुंडलकर दिग्दर्शित वजनदार (२०१६) मध्ये अभिनय केला होता.

Related topics