News Marathi

डोंबिवली रिटर्न ट्रेलर रिव्ह्यू – जेव्हा सामान्य माणूस त्याच्या जगण्याची दिशाच बदलतो


महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित या थरारपटामध्ये राजकारण आणि गुन्हेगारीच्या पाशात अडकलेल्या सामान्य माणसाची गोष्ट सांगितली आहे.

Suparna Thombare

संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांची प्रमुख भूमिका असलेला डोंबिवली रिटर्न चा ट्रेलर पाहून चित्रपटाच्या थरारक कथानकाची कल्पना येते.

महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित डोंबिवली रिटर्न मध्ये अनंत वेलणकर नावाचा एक मध्यम वर्गीय इसम जो रोज डोंबिवली स्थानक ते ऑफिस असा ट्रेनने प्रवास करतो, त्याची जीवनकथा दाखवली आहे. आणि लाखो प्रवाशांप्रमाणे वेलणकरला देखील या प्रवासाचा कंटाळा आला आहे. सचदेव त्याच्या पत्नींची भूमिका करत आहेत.

पण समजा याच सामान्य माणसाने त्याच्या जीवनाची दिशाच बदलली तर?

वेलणकर खूप वर्षांपासून एका फोटोस्टुडिओ मध्ये काम करतो. तिथे त्याच्या हाती एक फोटो लागतो आणि त्याच फोटोचा वापर करून तो आपले आयुष्य बदलवायचे ठरवतो. आणि यामुळे तो राजकारण आणि गुन्हेगारीच्या पाशात अडकत जातो. पण त्याचा उद्देश फक्त सामान्य माणसाच्या हातात पॉवर यावी हाच असतो.

ट्रेलर नक्कीच उत्सुकता जागवतो आणि कथानकसुद्धा रोचक आहे, पण दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ते सांगण्यात यशस्वी झालाय का हे चित्रपट पाहूनच कळेल.

डोंबिवली रिटर्न हा हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत २२ फेब्रुवारीला रिलीज होईल.

Related topics

Trailer review