News Hindi

टोटल धमाल मधील गाणे – सोनाक्षी सिन्हाची हेलन शी तुलना होऊ शकत नाही पण 'मुंगडा' चा रिमेक रेट्रो वाइब्स पुनर्निर्मित करतो


१९७७ मधल्या राजेश रोशन यांच्या अजरामर गाण्याच्या रिमेक वर्जन ला ज्योतिका टांगरी, शान आणि शुभ्रो गांगुली यांनी आवाज दिला आहे.

Shriram Iyengar

इन्कार (१९७७) मधल्या 'मुंगडा' या सुपरहिट गाण्याच्या रिमेक व्हर्जन मध्ये सोनाक्षी सिन्हा हेलनची जागा भरून काढणाऱ्या आहेत.

गौरव-रोशन यांनी संगीत दिलेल्या या गाण्यामध्ये फास्टआणि ईडीएम बीट्स वापरले आहेत. टोटल धमाल हा धमाल फ्रँचाइज मधला तिसरा चित्रपट असल्याने जुन्या गाण्याचे रिमेक वर्जन चित्रपटात वापरणे यात काहीच नवल नाही.

ज्योतिका टांगरी ने गायलेल्या या गाण्यात सोनाक्षी सिन्हाने डान्स केला आहे. सोनेरी रंगाच्या चमकणाऱ्या ड्रेस मध्ये सोनाक्षी हेलन सारख्या ग्लॅमरस दिसण्यात थोड्या प्रमाणात यशस्वी झाल्या असल्या तरी हेलनचे ते शरारती हावभाव पकडने मात्र त्यांना जमलेले नाही.

हेलनने त्यांच्या मनमोहक अदाकारीमुळे जी जादू केली होती तीच जादू कायम राखण्यात सोनाक्षी सिन्हांना मात्र अपयश आले आहे.

मूळ गाण्यात राजेश रोशन यांनी ढोलकी आणि तबला वापरल्यामुळे जो एक देशी बारचा फील आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या पूर्ण विपरीत गौरव-रोशन यांनी या गाण्यात ईडीएम बीट्स वापरले आहेत.

नवीन गाण्याच्या पार्श्वभूमीला शोभावा म्हणून गाण्याचा वेग वाढवला आहे. कुंवर तनेजा यांनी गाण्यातले अतिरिक्त शब्द लिहले आहेत, परंतु गाण्यात खरी मजा जुन्या लावणीमुळेच येते.

कदाचित नॉस्टॅल्जिया मुळे असेल पण जुना ताल नवीन बीट्स हे नक्कीच एक आगळंवेगळं संयोजन आहे.

ज्योतिका टांगरी यांनी उषा मंगेशकरांची जादू पुन्हा निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शान ला मात्र गाण्यामध्ये इंग्लिश रॅप करायला लावून अगदी वाया घालवले आहे. अजय देवगणला शुभ्रो गांगुली ने आवाज दिला आहे. अजय देवगणची गाण्यात अगदी शेवटी एन्ट्री होते त्यामुळे गांगुलींच्या वाट्याला फक्त एक दोन ओळी आल्या आहेत.

गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुद्धा सामान्यच आहे त्यामुळे गाण्याचे संगीत हाच गाण्याचा हिरो आहे असे आपण म्हणू शकतो.

इन्कार (१९७७) मधील राजेश रोशन यांचे संगीत असलेले ओरिजिनल गाणे उषा मंगेशकर यांनी गायले होते तर गाण्याचे शब्द मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते. इन्कार बॉक्स ऑफिसला तेवढा गाजवू शकला नव्हता परंतू हे गाणे मात्र त्या दशकातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी होते. हेलनच्या अजरामर गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित टोटल धमाल २२ फेब्रुवारीला रिलीज होईल. गाण्याचे नवीन आणि ओरिजिनल वर्जन खाली पहा.

 

Related topics

Song review