{ Page-Title / Story-Title }

News Hindi Marathi

स्माईल प्लिज चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप ह्रितिक रोशन च्या हस्ते


ह्रितिक ने या अगोदर विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.

फोटो - शटरबग्स इमेजेस

Keyur Seta

१ मार्च ला ह्रितिक रोशन स्माईल प्लिज या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप देणार आहेत. विक्रम फडणीस चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हृदयांतर (२०१७) नंतर दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. हृदयांतर मध्ये सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत होते.

ह्रितिक आणि फडणीस या दोघांची घनिष्ठ मैत्री आहे. हृदयांतर मध्ये ह्रितिक रोशन ने  स्वतःचीच भूमिका केली होती.

हा चित्रपट एका कॅन्सरशी लढत असलेल्या मुली विषयी आहे. आपल्या आयुष्यात फारच कमी दिवस शिल्लक असल्याचे समजताच ती ह्रितिक रोशनला भेटायची इच्छा व्यक्त करते, आणि ह्रितिक सुद्धा तत्परतेने तिची ही इच्छा पूर्ण करतात.

ह्रितिक रोशन ने चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला होता तर ऐश्वर्या राय ने चित्रपटाचे संगीत अनावरण केले होते.

त्यावेळी इंडियन एक्सप्रेस शी बोलताना या दोन कलाकारांचे कौतुक करत फडणीस म्हणाले होते, "ह्रितिक आणि ऐश्वर्या यांनी आमच्यासाठी जे केले आहे त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ह्रितिक ने चित्रपटात अभिनय करणे गरजेचे होते आणि मला आनंद आहे की त्यांनी त्याला होकार दिला. चित्रपटात त्यांची भूमिका खूपच सुंदर आहे."

स्माईल प्लिज ची कास्ट लॉन्चच्या वेळी घोषित केली जाईल.

Related topics