{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कारगिल गर्ल मध्ये जान्हवी कपूर होणार फायटर पायलट


शरण शर्मा चा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी आणि आयेशा रजा सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.

Mayur Lookhar

जान्हवी कपूर ने आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे.

१९९९ च्या कारगिल युद्धात शौर्याने लढलेल्या एयर फोर्स पायलट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा आहेत. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी आणि आयेशा रजा सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. या तीन कलाकारां पैकी एका कलाकाराच्या जवळच्या सूत्रांनी आम्हाला सांगितले, "जान्हवी आणि इतर कलाकारांनी चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात केली आहे. आणि हा शेड्युल एका हफ्त्यानंतर संपेल."

कारगिल च्या वीरांगना गुंजन सक्सेना च्या जीवनावर आधारित हा जीवनपट आहे. कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या दोन महिला पायलट (दुसऱ्या पायलट श्रीविद्या राजन) पैकी सक्सेना एक पायलट होत्या.

सक्सेना आणि विद्या १९९४ ला बनलेल्या २५ पायलट च्या पहिल्या महिला बॅच पैकी होत्या.

कारगिल युद्धात भारतीय सैन्याला मैदानात मदत करणे, मेडिकल सेवा आणि जेवण पोचवणे तसेच जखमी सैनिकांना परत घेऊन जाणे याची जबाबदारी सक्सेना आणि विद्या यांच्यावर होती.

आपल्या शौर्याचा परिचय देत सक्सेना आणि विद्याने चिता हेलिकॉप्टर्स च्या मदतीने शत्रूच्या क्षेत्रात जाऊन आपल्या ८० सैनिकांच्या तुकड्यांना सुखरूप परत आणले. युद्धानंतर त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. सक्सेना चे वडील आणि भाऊ सुद्धा सैन्यातच आहेत.

शर्मा या चित्रपटाने दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकत आहेत. ऐ दिल है मुश्किल (२०१६) या चित्रपटावर त्यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ये जवानी है दिवानी (२०१३) चित्रपटात त्यांनी दिग्दर्शकाचे सहाय्यक म्हणून काम पहिले होते.

जान्हवी कपूर ने धडक (२०१८) पासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरवात केली होती.

Related topics