{ Page-Title / Story-Title }

News Marathi

परफ्युम ट्रेलर – सैराटच्या धर्तीवर अजून एक लव्ह स्टोरी?


धर्मभेद आणि वर्गभेद चंदन आणि मेहक यांच्या प्रेमाच्या आडवे येतात.

Keyur Seta

आपण लोकांना एखाद्याच्या रूपावर भाळून प्रेमात पडताना पहिले आहे. पण दिग्दर्शक करण तांडेल यांच्या परफ्यूम मध्ये मेहक (मोनालिसा बागुल) चंदन (ओमकार दीक्षित) ह्याच्या परफ्युमच्या सुवासावर भाळून त्याच्या प्रेमात पडते.

कदाचित निर्मात्यांनी डिओड्रन्टस च्या जाहिराती थोड्या जास्तच गांभीर्याने घेतले असावेत.

नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर मध्ये आपण पाहतो की मेहकला एकदा अचानक चंदनच्या परफ्युमचा सुवास येतो. चंदन तिच्याच कॉलेज मध्ये शिकतोय हे कळताच तिला खूप आनंद होतो. त्यांची भेट होते आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

तुम्हाला ही एक सामान्य लव्ह स्टोरी वाटत असेल पण यात एक ट्विस्ट आहे. धर्मभेद आणि वर्गभेद चंदन आणि मेहक यांच्या लव्ह स्टोरीच्या आडवे येतात.

ट्रेलर तुम्हाला नागराज मंजुळे दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सैराट (२०१६) ची नक्कीच आठवण करून देईल. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ची प्रमुख भूमिका असलेल्या या कथेवर मराठीत काही चित्रपट येऊन गेले आहेत. यंटम (२०१८) आणि बबन (२०१८) ही त्याचीच काही उदाहरणे.

बागुल यांचा अभिनय थोडा कच्चा आहे असं वाटतं, खास करून जेव्हा त्या इंग्रजी संवाद म्हणायचं प्रयत्न करतात. दीक्षित यांचा अभिनय बरा आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

अमोल कागणे फिल्म्स निर्मित परफ्युम १ मार्च पासून थिएटर मध्ये आपला सुगंध पसरवेल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review