{ Page-Title / Story-Title }

News Hindi

मिलन टॉकीज ट्रेलर – प्रेम, फिल्म्स आणि मसाला मिळून अली फजल व श्रद्धा श्रीनाथ यांचा हा चित्रपट बनला आहे


दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांचा हा चित्रपट १५ मार्च ला रिलीज होईल.

Shriram Iyengar

सध्या जुन्या गाण्यांच्या रीमेकची चलती आहे आणि त्याच वेळी तिग्मांशु धुलिया आपला मिलन टॉकीज हा १९६०, १९७० आणि १९८० च्या दशकांच्या चित्रपटांची आठवण करून देणारा चित्रपट घेऊन आले आहेत.

या मनोरंजक ट्रेलर मध्ये १९८० च्या दशकातल्या चित्रपटातले काही घटक पण त्याच बरोबर आजच्या काळात जातीजातीं मध्ये होणारी युद्धं सुद्धा आहेत.

तिग्मांशु धूलियांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अली फजल, श्रद्धा श्रीनाथ, आशुतोष राणा, संजय मिश्र आणि सिकंदर खेर यांच्या भूमिका आहेत.

ट्रेलरची सुरुवात होते मुघल-ए-आझम (१९६०) चित्रपटातील सलीम म्हणजेच दिलीप कुमार यांच्या डायलॉग ने, पण या वेळी हा डायलॉग बोलत आहे अन्नू म्हणजेच अली फजल.

अन्नूला देशातला सर्वोत्तम दिग्दर्शक व्हायचे आहे, पण त्याच्या वडिलांना (धूलियांना) हे मान्य नाही.

अन्नू पंडा समुदायातील मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिचे वडील आशुतोष राणा आणि सिकंदर खेर यांचा राग ओढवून घेतो.

लखनऊ मध्ये घडणाऱ्या या कथे मध्ये अन्नू आणि त्याच्या मित्रांची स्वप्न आणि त्यांचे स्ट्रगल धूलियांनी अगदी योग्य दाखवले आहे.

हा चित्रपट अनेक जुन्या सिनेमांची आठवण करून देतो पण हा टॉकिज विषयी असल्याने यात नवल नाही. ट्रेलर मध्ये 'धत तेरी तेरी जमाना' हे मसाला एन्टरटेनर गाणे सुद्धा आहे.

पण जेव्हा ट्रेलर मध्ये आशुतोष राणा या प्रेमी जोडप्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतानाचा ट्रॅक सुरु होतो तेव्हा ट्रेलर थोडा बोर करतो. खेर सुद्धा आशुतोष राणांच्या दलात असतात परंतु नंतर एका सीन मध्ये ते फिल्म सेलिब्रेट करताना दिसतात यावरून असे वाटते की ते नंतर त्यांचं दल बदलतात.

मिलन टॉकीज १५ मार्च ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review