{ Page-Title / Story-Title }

Interview Marathi

त्यांच्या डोळ्यात खरोखर माझ्या पात्राविषयी चिंता होती, गली बॉय रणवीर सिंह च्या सहानुभूती विषयी विजय वर्मा बोलले


गली बॉय पासून आता विजय वर्मा शेवटी स्पॉटलाईट मध्ये आले आहेत. आपल्या पात्राविषयी त्यांनी आमच्याबरोबर खूप गप्पा मारल्या.

Shriram Iyengar

"फोन वाजणे थांबतच नाही," विजय वर्मा म्हणाले. झोया अख्तर च्या गली बॉय मध्ये मोईनच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आता विजय वर्मा स्पॉटलाईट मध्ये आले आहेत. वर्सोवाच्या आपल्या शांत अपार्टमेंट मध्ये आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून त्यांनी सिनेस्तान.कॉम शी गप्पा मारल्या.

"मी अजून या नवीन ओळखीची सवय लावून घ्यायचा प्रयत्न करतोय" ते म्हणाले. आपला पहिला चित्रपट चिटगॉन्ग (२०१२) पासून हळूहळू आपली ओळख निर्माण करायला सुरवात केली. २०१६ मध्ये पिंक मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आपली छाप सोडल्यानंतर २०१७ मध्ये मान्सून शूटआऊट मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती.

विजय वर्मा मान्सून शूटआऊट (२०१७) मध्ये

गली बॉय मध्ये त्यांनी मुराद चा हुशार आणि कठोर मित्र मोईनची भूमिका केली आहे. त्यांनी आपली भूमिका इतक्या तन्मयतेने निभावली की ते रणवीर सिंह च्या पात्राची ढाल म्हणून उभे राहिले. "मोइनच्या पात्रासोबत आपल्या समोर काही नवीन गोष्टी येतात, माझी इच्छा होती की या गोष्टी प्रेक्षकांच्या अपेक्षे बाहेर असू नयेत," आपल्या पात्राविषयी बोलताना वर्मा म्हणाले.

पण त्यांनी आम्हाला आठवण करून दिली की हे सर्व रणवीर आणि त्यांच्यातल्या अभिनयाच्या देवाणघेवाणी मुळेच शक्य झाले. "त्यांनी मला सिटी ऑफ गॉड्स (२००२) हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की ली झे म्हणजेच मोईन आहे. आणि हा अगदी योग्य संदर्भ होता."

विजय वर्मा गली बॉय (२०१८) मध्ये

वर्मा साठी गली बॉय चे यश हीच एकमवे गोष्ट त्यांच्या पारड्यात नाही तर ते आता इम्तियाज अली यांच्या वेब-सिरीज मध्ये अभिनय करणार आहेत तसेच अनुराग कश्यपच्या चित्रपटात सुद्धा अभिनय करणार आहेत. "मी आता काही खूप चांगल्या लोकांबरोबर काम करत आहे," ते म्हणाले.

आशा आहे की असेच चालू राहील. त्यांच्याशी झालेल्या चर्चेमधले काही प्रश्न उत्तरे प्रस्तुत करत आहोत.

आपली भेट या अगोदर मान्सून शूटआऊट (२०१७) च्या प्रमोशन दरम्यान झाली होती आणि ते वर्ष तुमच्यासाठी खूप स्पेशल होते.

मी डिसेंबर महिन्यात गली बॉय साइन केला आणि जानेवारी मध्ये शूटिंगला सुरुवात केली, त्यानंतर मी दोन प्रोजेक्ट्स सुद्धा संपवले आहेत. २०१८ मध्ये मी खूपच व्यस्त होतो. जे बी मी २०१८ मध्ये रोवले त्याचे फळ मला नंतर मिळेल.

एवढं स्ट्रगल केल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धी मुळे तुम्हाला खूप आनंद झाला असेल.

हो, आनंद तर होतो पण मला इतक्या प्रसिद्धीची सवय नाही. त्यामुळे मी थोडा गोंधळलो आहे. पण मी खुश आहे.

मोईन या पात्राविषयी तुम्हाला काय सांगितले होते?

मला माझ्या पात्राविषयी माहिती सर्वात पहिल्यांदा कास्टिंग टीम ने सांगितली. त्यावेळी तो एक मेकॅनिक आणि ड्रग डीलर होता. पण झोयाला भेटल्यानंतर मला समजले की या पात्राला इतरही कंगोरे आहेत.

वरवरून पहिला तर तो एक मेकॅनिक आहे पण त्याचा इतरही व्यवसायांमध्ये हात आहे आणि हे सर्व व्यवसाय बेकायदेशीर आहेत. त्याचं हे सर्व काही पोटासाठी चाललं आहे. अगदी लहान मुलांना पण हे काम करायला लावण्यात त्याला काहीच चूक वाटत नाही. त्याच्या मते ही एक समाजसेवाच आहे.

या भूमिकेसाठी तुम्ही काय संदर्भ घेतले होते?

चित्रपटात मोईन अगदी काहीच दृश्यांमध्ये दिसतो. आणि प्रत्येक स्टेजमध्ये मोइनबद्दल नवीन गोष्टी समोर येतात. मी माझ्या भूमिकेत एक सुसूत्रता आणायचा प्रयत्न केला आहे. तो दोन भिन्न स्वभावाचे मिश्रण आहे. त्यातला एक तर फक्त दिखावा आहे. तो काही गोष्टी लपवून ठेवतो.

शारीरिक तयारी पेक्षा मला बौद्धिक तयारी करण्यात जास्त वेळ लागला. पण एकदा का तुम्ही त्यात यशस्वी झालात की इतर बाहेरच्या गोष्टी जसे मेकअप आणि कॉस्च्युम टीम हाताळतात आणि त्यांनी ही जबाबदारी अगदी उत्कृष्टरित्या हाताळली आहे.

पण रणवीर सिंह जे स्वतः उत्कृष्ट अभिनेते आहेत आणि त्यांच्यासमोर उभं राहून हा ऍटिट्यूड तुम्ही कसा आणलात? तुमची शरीरयष्टी सुध्दा अगदी पिळदार नाही, मग एका ड्रग डीलरचा शारीरिक हावभाव तुम्ही कसे आणलेत?

हा ऍटिट्यूड स्क्रिप्टमुळेच आला. ते पात्र स्क्रिप्ट मध्ये अगदी त्याच भाषेत लिहलं होतं. हो, रणवीर सिंह ला भारी पडेल असं शारीरिक दृष्ट्या दिसणं थोडं कठीणच होतं. झोयाने मला सांगितले होते की मोईन हा सगळ्यात धैर्यशील मुलगा आहे.

तुम्ही हे देखील लक्षात घ्यायला हवं की रणवीर मुरादची भूमिका साकारत होते, ज्याच्यावर वरचढ ठरणे तसे कठीण नाही. स्क्रिप्टमध्ये प्रत्येक पात्राविषयीच्या सूचना अगदी स्पष्ट सांगितल्या होत्या. आणि सर्वच कलाकारांनी त्या सूचनेचे पालन केले.

रणवीर सिंह आणि विजय वर्मा गलीबॉय(२०१८) मध्ये 

आम्ही चर्चा करताना ठरवले की मोईन छोटीमोठी कामे करत राहीला तरी त्याच्याकडे पैसे मात्र बऱ्यापैकी असतील. आणि इतर सर्व मुलांपेक्षा तो वयाने थोडा मोठा सुद्धा आहे.

झोया त्यांच्या स्वभावा प्रमाणेच सर्व गोष्टींवर अगदी बारीक लक्ष ठेवून होत्या म्हणजे आम्ही कसे दिसतो कसे बोलतो या सर्व गोष्टींवर त्यांचं लक्ष होतं. त्यांना पूर्ण स्क्रिप्ट माहिती आहे.

रस्त्यावरची भाषा शिकण्यासाठी कोणते खास प्रक्षिशण घेतले होते काय?

आम्हाला फक्त भाषा शिकण्यावरच नाही तर ती नक्की कशी बोलावी याचे प्रशिक्षण घ्यायचे होते. त्याच वेळी आम्ही विजय मौर्य आणि रॅपर्स एम सी अल्ताफ, राहुल सीस्के यांना भेटलो. आम्ही काही चुका तर करत नाही ना यासाठी ते डबिंग स्टुडिओमध्ये उपस्थित होते.

मी माझ्या पात्रासाठी ५० नवीन शब्द सुद्धा शिकलो पण ते या चित्रपटात वापरले नाहीत.

हे पात्र अजून ७० च्या दशकाच्या खास प्रेमात आहे असे वाटते, खासकरून बच्चन सारखं खिशात हात घालून चालण्याची त्याची स्टाइल. यामागे काही विशेष कारण आहे का?

मला वाटतं  की मी स्वतः सुद्धा अजून त्याच दशकात आहे. विंटेज आणि रेट्रो गोष्टी मला प्रचंड आवडतात. मला वाटतं की त्यावेळचं जग हे अधिक आकर्षक होतं. तो काळ खूप साधा होता.

भूमिकेमध्ये घुसण्यासाठी तुम्ही किती दिवस वर्कशॉप करत होता?

आम्ही अतुल मोंगिया बरोबर दोन वर्कशॉप्स केले. रणवीर आणि इतर मुले सुद्धा वर्कशॉपला उपस्थित होते. झोयाने आम्हाला अगोदरच पटकथा वाचन दरम्यान बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या. वर्कशॉप्स मध्ये आम्ही आमच्या पात्रांबद्दल चर्चा केली.

मोईनचे एक रहस्य आहे त्यामुळे माझी इच्छा होती की हे रहस्य असे असावे की प्रेक्षक त्याचा अगोदरच अंदाज लावू शकतात. म्हणूनच त्याच्या स्वभावामध्ये स्प्लिट पर्सनॅलिटीचा थोडा अंश होता जेणेकरून प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसणार नाही.

मुराद बरोबरचा शेवटचा सीन खूप भावनिक आहे. याची तयारी तुम्ही दोघांनी कशी केली?

आम्ही शूटच्या दिवशी सुद्धा या सीन चा अजिबात सराव केला नाही. मला हे देखील ठाऊक नव्हतं की रणवीर या दृश्यात नक्की काय करणार आहे.

मोईन साठी त्याच्या आयुष्यात कोणीच उभं राहिला नाही त्यामुळे तो स्वतःच आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुरादला त्याची खूप काळजी वाटते.

मी एक तासा साठी स्वतःला बंद करून घेतले होते तर रणवीर सुद्धा हेडफोन घालून स्वतःच्याच विश्वात रममान होते. त्यांनी सेटवरून बाकीच्या सर्वांना हटवले होते.

रणवीरने ओळखलं की मोईन नक्की कशातून जातोय. त्यांच्या डोळ्यात माझ्या पात्राविषयी खरोखर काळजी दिसत होती. मला त्यांच्या डोळ्यात सहानुभूती दिसत होती. ते त्या सीन मध्ये खूपच भावनिक झाले होते. मला वाटलं की सहानुभूती द्यावी पण मोईन असं करू शकत नव्हता.

रणवीर सिंग गली बॉय मध्ये

रणवीर सिंह सध्या आपल्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट पडाव पाहत आहेत. तुमच्या मते इतरां पेक्षा रणवीर मध्ये काय वेगळं आहे? तुम्ही या अगोदर नवाझुद्दिन सिद्दीकी बरोबर काम केले आहे, दोघे ही मेथड ऍक्टर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. या दोघांमध्ये काय फरक आहे?

या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. एक म्हणजे त्या दोघांनाही आपण काय करत आहोत याचं पूर्ण ज्ञान आहे. आणि स्वतःच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास. दुसरं म्हणजे सत्याचा शोध. ते दोघेही नेहमी पडद्यावर जितकं खरं वागता येईल याचा प्रयत्न करतात. ते कधीही खोटी प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करत नाहीत. त्यांची आपल्या कामाच्या प्रति असलेली निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

जर एखादी गोष्ट जशी हवी तशी होत नसेल तर रणवीर सिंह मला सांगत की "असं करून बघ". मग आपोआप समोरच्या व्यक्तीला स्वतःहूनच ती गोष्ट सापडते.

चित्रपटा दरम्यान आमच्यात चर्चा होत असे. त्यावेळी त्यांनी मला सिटी ऑफ गॉड्स (२००२) हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. ते त्यावेळी म्हणाले लील झे हाच मोईन आहे. आणि हा अगदी योग्य सल्ला होता. चित्रपटक्षेत्रातलं त्यांचं ज्ञान पाहून मी प्रभावित झालो.

झोया अख्तर दिग्दर्शक म्हणून कशा आहेत?

जिंदगी ना मिलेगी दोबारा (२०११) आणि दिल धडकने दो (२०१५) या जरी एका विशिष्ट अश्या दुनियेत राहणाऱ्या लोकांच्या कथा असल्या तरी दोन्ही चित्रपट तुम्हाला समृद्ध करतात.

एक फॅन म्हणून तुम्ही नेहमीच हा विचार करता की त्यांनी इतर कलाकारां बरोबर इतके उत्कृष्ट काम केले आहे तर मला सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा हिस्सा व्हायचा आहे.

ते तुम्हाला ऐकून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. जेव्हा तुम्ही काही सल्ला देता तेव्हा नक्की तुम्ही काय विचार करत आहात हे त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतात. अश्या प्रकारे त्या तुमचा परफॉर्मन्स बनवत नाहीत तर फक्त त्याला आकार देतात. ते तुम्हाला तुमच्या मर्जी प्रमाणे परफॉर्मन्स करायचे स्वातंत्र्य देतात, नंतर त्यांना नको असलेल्या गोष्टी त्या काढून टाकतात. कोणत्याही परफॉर्मन्स ला आकार द्यायची त्यांची प्रक्रिया खूपच आकर्षक आहे.

चित्रपटात असे कोणते दृश्य होते का जे चित्रपटात असावे अशी तुमची इच्छा होती पण झोयाला ते दृश्य चित्रपटात नको होते?

नाही. माझी सर्व दृश्ये चित्रपटात आहेत. कोणतेच दृश्य काढून टाकले नाही. हां, दोन दृश्यांची लांबी कमी केली पण मी ते समजू शकतो.

एक दृश्य चित्रपटात नव्हते ते म्हणजे माझ्या लोकअपचे दृश्य. ते दृश्य एडिट केले होते. झोया म्हणाल्या, "तू खूप छान अभिनय केलाय आणि चित्रपटात तुझी सर्व दृश्ये आहेत, फक्त हे दृश्य मला काढून टाकावे लागत आहे. मी पाहिलं की ते कोणते दृश्य आहे. मला लक्षात नाही की त्या दृश्यामागे नक्की काय हेतू होता पण मला लक्षात आहे की रणवीर बरोबर ते एक भावनिक दृश्य होते. माझ्यासाठी ते खूप खास दृश्य होते, म्हणून मी ते दृश्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली, पण झोया म्हणाल्या की हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी पण खूप कठीण होते. नंतर जेव्हा जावेद अख्तरांनी फोकस स्क्रिनिंग मध्ये हा चित्रपट पहिला तेव्हा त्यांनी ते दृश्य चित्रपटात टाकण्यास सांगितले.

गेल्या दोन वर्षात गली बॉय आणि पिंक नंतर आता तुम्ही नक्की काय अनुभव करत आहात?

कोणताही प्रोजेक्ट निवडायचा निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप कठीण असते. विचार प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रिया या दोन्ही स्तरांवर हे गोष्ट कठीण असते. मी आता अश्या स्थितीत आहे की मी दिग्दर्शकांना कॉन्टॅक्ट करू शकतो आणि ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात.

पुढे काय?

मी इम्तियाज अली बरोबर एक वेब-सिरीज करत आहे. त्यांनी त्याची अधिकृत घोषणा अजून केली नाही. वायकोम १८ यांची निर्मिती आहे.

मी बमफाड़ नावाचा चित्रपट पूर्ण केला आहे. अनुराग कश्यप चित्रपटाचे निर्माता आहेत. माझी त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे पण ते फक्त माझ्या चित्रपटांचे निर्माता अथवा प्रस्तुतकर्ता राहिले आहेत.

मी आता काही प्रसिद्ध लोकांबरबर काम करतोय याचा आनंद आहे. मी मंटो (२०१८) मध्ये सुद्धा छोटी भूमिका केली कारण माझी त्या कथानकाशी माझं नाव जोडलं जावं अशी इच्छा होती.

Related topics