{ Page-Title / Story-Title }

News Hindi

फोटोग्राफ ट्रेलर – नवाझुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांची अनोखी जोडी


रितेश बात्रा दिग्दर्शित या चित्रपटात भिन्न पार्श्वभूमी असलेल्या दोन पात्रां मधल्या अनोख्या बंधाची गोष्ट आहे.

Suparna Thombare

इरफान खान आणि निम्रत कौर यांच्या द लंचबॉक्स (२०१३) चित्रपटानंतर दिग्दर्शक रितेश बात्रा यांनी मुंबईत घडणारी आणखी एक लव्ह स्टोरी लिहली आहे.

मुंबईच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अगणित चित्रपट बनले आहेत (नुकताच रिलीज झालेला गली बॉय त्याचेच एक उदाहरण). पण रितेश बात्रा आपल्या चित्रपटांतील वेगवेगळ्या पात्रांच्या साहाय्याने या शहरातले दोन भिन्न जग दाखवायचा प्रयत्न करतात.

फोटोग्राफ मधील मुख्य पात्र सुद्धा एकाच शहरातले असले तरी त्यांचे जग एकमेकांपासून खूप वेगळे आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी गेटवे ऑफ इंडिया च्या परिसरात असणाऱ्या फोटोग्राफर ची भूमिका साकारत आहेत तर सान्या मल्होत्रा एका लाजाळू स्वभावाच्या अभ्यासू मुलीची भूमिका करत आहेत. तिला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे आहे.

सिद्दिकींच्या पात्राची आजी त्याचे लग्न करण्यास त्याच्यावर दबाव टाकत असते म्हणून सिद्दीकी मल्होत्राला आपली मंगेतर असल्याचं नाटक करायला सांगतात. दोघांच्याही राहणीमानात भिन्नता असली तरी यादरम्यान त्यांच्यात एक बांध निर्माण होतो.

कॅमेरा अँगल्स आणि ट्रेलरचा असलेला संथ वेग पाहून रितेश बात्रा यांनी या चित्रपटात सुद्धा आपल्या फिल्ममेकिंगची पद्धत द लंचबॉक्स सारखीच ठेवली आहे असे वाटते.

चित्रपटात सचिन खेडेकर, विजय राज, जिम सरभ आणि २०१० च्या पीपली (लाइव्ह) मधून ज्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवली असे फारुख जाफर सुद्धा आहेत.

ऍमेझॉन स्टुडिओची निर्मिती असलेल्या फोटोग्राफ चा प्रीमियर जानेवारी मध्ये संडान्स फिल्म फेस्टिवल झाला. हा चित्रपट १५ मार्च ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review