सचिन पिळगावकर चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहेत.
अशी ही आशिकी ट्रेलर – अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे यांची लव्ह स्टोरी स्वित्झरलँड मध्ये
Mumbai - 25 Feb 2019 19:00 IST


Keyur Seta
आता मराठी सिनेमात सुद्धा स्वित्झरलंड मध्ये घडणारी लव्ह स्टोरी दिसणार. अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकी या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या मध्य युरोपियन देशात आपल्याला अनेक हिंदी चित्रपटातल्या हिरो-हेरोइन सारखे रोमान्स करताना दिसतील.
नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरवरून असे वाटते की हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. पण ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावता येत नाही. कदाचित हे मुद्दाम केले असावे, परंतू त्यामुळे ट्रेलरला एक फ्लो नाही. जेव्हा चित्रपटातील दोन महत्वाची पात्रं एक दुकान लुटायचा प्रयत्न करतात तो सीन खूप आपल्याला कन्फ्युज करतो.
अभिनय बेर्डे यांच्या ती सध्या काय करते (२०१७) चित्रपटातील अभिनयासाठी सर्वानीच कौतुक केले होते. या चित्रपटात सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. हेमल इंगळे बरोबर त्यांची जोडी नक्कीच पाहण्यासारखी असेल.
पिळगावकर यांनी चित्रपटाला संगीत सुद्धा दिले आहे. सोनू निगमने चित्रपटातील चारही गाणी गायली आहेत. ट्रेलरमध्ये ऐकायला मिळणारे टायटल सॉंग श्रवणीय झाले आहे.
अशी ही आशिकी १ मार्च ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.