News Hindi

अनुराग बासू यांच्या अँथॉलॉजि चित्रपटातून सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच एकत्र


डार्क कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षक अजून निश्चित केलेले नाही.

Our Correspondent

आदित्य रॉय कपूर यांनी काही दिवसां पूर्वी सान्या मल्होत्रा आणि अनुराग बासू यांच्या बरोबरचा एक फोटो 'नव्या प्रवासाला सुरुवात' असे शीर्षक देऊन सोशल मीडियावर शेर केला.

हाच फोटो सान्या मल्होत्राने सुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेर केला.

मल्होत्रा आणि रॉय कपूर यांनी अनुराग बासू बरोबर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात देखील केली आहे. डार्क कॉमेडी असलेला हा अँथॉलॉजि चित्रपट असणार आहे.

आय ए एन एस ला दिलेल्या मुलाखतीत बासू म्हणाले, "मी स्वतःला नशीबवान समजतो की मला इतक्या टॅलेंटेड तरुण कलाकारांची साथ मिळणार आहे. पण म्युसिक साठी मात्र माझा जूना मित्र प्रीतम वर माझा विश्वास आहे. माझ्या पुढील चित्रपटासाठी मी भूषण कुमार यांच्याबरोबर काम करत आहे ही माझ्या साठी भाग्याची गोष्ट आहे."

बासू यांनी अनेक कलाकारांना एकत्र घेऊन या अगोदर लाइफ इन अ... मेट्रो (२००७) हा चित्रपट बनवला होता. अजून कोणतीच ऑफिशियल बातमी आली नसली तरी सूत्रांनुसार बासूच्या या चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी हे सर्व कलाकार काम करणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

🌝

A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_) on

आदित्य रॉय कपूर यांचा शेवटचा चित्रपट ओके जानू (२०१७) बॉक्सऑफिसवर आपटला होता. परंतू त्यांचे पुढील चित्रपटांची यादी नक्कीच अशादायी आहे. धर्मा प्रोडक्शनचा कलंक, सडक २ आणि हा अँथॉलॉजि चित्रपट हे त्यातलेच काही चित्रपट.

सान्या मल्होत्राने २०१८ मध्ये बधाई हो हा सुपरहिट चित्रपट आणि विशाल भारद्वाज यांचा पटाखा (२०१८) या चित्रपटात काम केले. रितेश बात्रा दिग्दर्शित फोटोग्राफ या चित्रपटात त्या आपल्याला लवकरच दिसतील. या चित्रपटात त्यांच्या बरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे.

Related topics