News Hindi

लुका चुप्पी चित्रपटातील 'तू लॉंग मैं इलायची' गाणं: क्रिती आणि कार्तिक पुन्हा एका पंजाबी रीमिक्स मध्ये


या वेळी तनिष्क बागची यांनी लॉंग लाची या पंजाबी चित्रपटातील सुपरहिट गाण्याचे रीमिक्स केले आहे.

Suparna Thombare

लुका चुप्पी या चित्रपटासाठी 'फोटो सॉंग' आणि 'कोका कोला' ही पंजाबी गाणी रीमिक्स केल्यानंतर आता तनिष्क बागची यांनी लॉंग लाची (२०१८) या पंजाबी चित्रपटातील मन्नत नूर यांनी गायलेल्या शीर्षक गाण्याचे सुद्धा रीमिक्स केले आहे.

निर्मात्यांनी अजून एकही ओरिजिनल गाणे रिलीज केलेले नाही ही आश्चर्याची बाब आहे.

गीतकार कुणाल वर्मा यांनी कोरस मध्ये ओरिजिनल गाण्यातलेच शब्द फक्त हिंदीमध्ये भाषांतरित करून वापरले आहेत. बागचीने सुद्धा ओरिजिनल गाण्याचे बीट्स आणि टेम्पो मध्ये काही बदल केलेला नाही.

विडिओ मध्ये सुद्धा टिपिकल लग्न सोहळा आणि डान्स आहे त्यामुळे विडिओ मध्ये नावीन्य नाही. गाण्यात क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनची काही रोमँटिक दृश्ये आहेत. पण जेव्हा ओरिजिनल गाणे फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे तेव्हा कोणाला हे सर्वसाधारण रीमिक्स गाणे ऐकायला आवडेल?

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी लुका चुप्पी मध्ये एका छोट्या शहरातल्या लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची गोष्ट सांगितली आहे. हा चित्रपट १ मार्च ला रिलीज होईल. खाली 'तू लॉंग मैं इलायची' रीमिक्स आणि ओरिजिनल गाणे पहा.

 

Related topics

Song review