{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सनी देओल यांचा मुलगा करण पल पल दिल के पास या चित्रपटात – पोस्टर्स पहा


ही एक लव्ह स्टोरी आहे आणि नायिका सहेर बंबा हीचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

Keyur Seta

सनी देओल यांचे पुत्र करण देओल यांचा पल पल दिल के पास या चित्रपटाचे काही पोस्टर आता बाहेर आले आहेत. ही एक लव्ह स्टोरी आहे आणि नायिका सहेर बांबा हीचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. सनी देओल स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

देओल कुटुंबासाठी ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. धर्मेंद ने आपले पुत्र सनी ला बेताब (१९८३) या रोमँटिक चित्रपटातून लॉन्च केले होते. अभिनेत्री अमृता सिंग यांनी सुद्धा याच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

आता ३६ वर्षानंतर सनी आपल्या मुलाला एका नवीन नायिकेसह लॉन्च करणार आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्टार्स च्या मुलांना लव्ह स्टोरी मधून एका नवोदित नायिकेसह लॉन्च करण्याचा ट्रेंड खूप वर्षांपासून चालत आला आहे. कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा लव्ह स्टोरी (१९८१) तर ह्रतिक रोशन आणि अमीषा पटेल यांचा कहो ना... प्यार है (२०००) ही त्याचीच काही उदाहरणे. 

पोस्टर्स पाहून आपण सांगू शकतो की करण आणि बंबा हे प्रेमी जोडपं एका प्रवासाला निघाले आहेत. एका पोस्टरमध्ये ते आपल्याला टेकडीवर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. दोघेही एकत्र छान दिसत आहेत.

पल पल दिल के पास १९ जुलै २०१९ ला रिलीज होईल.

Related topics

Poster review