{ Page-Title / Story-Title }

News Hindi Kannada Tamil Telugu

सी आर पी एफ जवानाच्या अंत्यविधीसाठी पोचलेल्या प्रकाश राज यांना उपस्थित लोकांच्या विरोधामुळे परतावे लागले


अभिनेता आणि कार्यकर्ता प्रकाश राज कर्नाटकातल्या एका गावात शाहिद जवानाच्या अंत्यविधीसाठी गेले होते.

Mayur Lookhar

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी उजव्या विचारसरणीच्या इतर दलां विरुद्ध नेहमी आवाज उठवणारे प्रकाश राज यांना नाइलाजास्ताव कर्नाटकातल्या मल्लाहल्ली गावातून परत जावे लागले.

ते तिथे पुलवामा मध्ये शाहिद झालेल्या जवानाच्या अंत्यविधीसाठी पोचले होते. परंतु तिथे उपस्थित काही लोंकानी प्रकाश राज यांच्या उपस्थितीवर प्रश्न उठवले.

१४ फेब्रुवारी ला पुलवामाला झालेल्या हमल्यात कर्नाटकातल्या मल्लाहल्ली गावातले जवान शाहिद झाले होते त्यांच्या अंत्यविधीसाठी प्रकाश राज तेथे गेले होते.

के एम दोड्डी मध्ये प्रकाश राज भाषण देत होते. भाषणात ते म्हणाले की "ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नसून शांतता राखून देशाच्या नेतृत्वासोबत ठामपणे उभं राहण्याची आहे. या दुःखद वेळी आपापसातले भेदाभेद विसरून एकत्र यायला हवे. जर कोणी शत्रू आपल्यावर हल्ला करत असेल देशाचे नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की भेदाभेद विसरून आपण एकत्र यायला हवे. आपण एकत्र उभे राहुन आपल्या देशाच्या नेतृत्वाला मदत केली पाहिजे."

त्याच वेळी गर्दीतील काही लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. जेवहा कोणती घटना घडते तेव्हाच असे बोलन्या ऐवजी दररोज असे बोला, असं गर्दीतले काही लोक त्यांना सांगू लागले.

प्रकाश राज यांनी उत्तर दिले की ते दररोज देशातल्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात, परंतू त्यांना पुढे बोलू दिले नाही. उपस्थति लोक जोरजोरात घोषणा देत स्टेजच्या दिशेने येऊ लागले. त्यातल्या एकाने प्रकाश रज यांच्या हातातला माइक खेचून घेतला व त्यांना धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न केला. पोलीस व सुरक्षा रक्षकांनी प्रकाश राज यांना सुखरूप बाहेर आणले.

खाली या घटनेचे दोन विडीओ पहा.

 

Related topics

Intolerance