{ Page-Title / Story-Title }

News Marathi

वेडिंग चा शिनेमा टीजर – मुक्ता बर्वे बनल्या वेडिंग डिरेक्टर


बर्वे, भाऊ कदम आणि प्रवीण तरडे यांची फिल्म क्रू म्हणून निवड हा एक इंटरेस्टिंग निर्णय आहे.

Keyur Seta

लग्नाभोवती फिरणारे अनेक मराठी चित्रपट या अगोदर येऊन गेले. मुंबई-पुणे-मुंबई (२०१५) आणि शुभ लग्न सावधान (२०१८) त्याचीच काही उदाहरणे.

पण सलील कुलकर्णी दिग्दर्शित वेडिंग चा शिनेमा या सर्वांपेक्षा वेगळा आहे कारण हा चित्रपट एका लग्नावर डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या क्रू बद्दल आहे.

प्रकाश (शिवराज वायचळ) याचे त्याच्या प्रेयसी (ऋचा इनामदार) बरोबर लग्न होणार आहे. एक फिल्ममेकर्स ची टीम त्यांच्या या लग्नावर डॉक्युमेंटरी बनवत आहे. या टीम मध्ये आहेत दिग्दर्शक (मुक्ता बर्वे), छायाचित्रकार (भाऊ कदम) आणि क्रू मेम्बर (प्रवीण तरडे).

दिग्दर्शिकेला अगदी टिपिकल वेडिंग चित्रपटांपेक्षा वेगळा चित्रपट बनवायचा आहे. नुकताच रिलीज झालेला टीजर पाहून चित्रपटा विषयी उत्सुकता वाढते. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे.

फिल्म क्रू जेव्हा शूटिंग करत असतात तेव्हा काही विनोदी प्रसंग घडतात. फिल्म क्रू म्हणून मुक्ता बर्वे, भाऊ कदम आणि प्रवीण तरडे यांची निवड करण्याचा निर्णय नक्कीच आपले लक्ष वेधून घेतो.

प्रमुख भूमिका असलेले शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांची जोडी सुद्धा चांगली आहे. चित्रपटात शिवाजी साटम नवऱ्यामुलाच्या वडिलांची भूमिका करत आहेत.

सलील कुलकर्णी गेल्या १५ वर्षांपासून संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. वेडिंग चा शिनेमा हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.

वेडिंग चा शिनेमा १२ एप्रिल ला रिलीज होईल. टीजर खाली पहा.

Related topics

Trailer review