{ Page-Title / Story-Title }

News Hindi

निर्माते दिनेश विजान लुका चुप्पी आणि अर्जुन पटियाला पाकिस्तान मध्ये रिलीज करणार नाहीत


१४ फेब्रुवारीला पुलवामाला झालेल्या आतंकवादी हमल्याचा निषेध म्हणून मॅडडॉक फिल्म्स ने हा निर्णय घेतला.

Our Correspondent

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा आतंकवादी हमल्याचा निषेध म्हणून निर्माते दिनेश विजान यांनी त्यांचे लुका चुप्पी आणि अर्जुन पटियाला हे चित्रपट पाकिस्तान मध्ये रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मॅडडॉक फिल्म्स ने घोषणा केली के ते या पुढे आपला कोणताच चित्रपट आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये रिलीज करणार नाहीत.

जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटने कडून पुलवामा येथे घडवून आणलेल्या आतंकवादी हमल्यात भारताच्या ४० सी आर पी एफ जवानांना आपला जीव गमवावा लागला.

या हमल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशन यांनी पाकिस्तानी कलाकारांवर भारतामध्ये काम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक इंद्रकुमार यांचा टोटल धमाल सुद्धा पाकिस्तान मध्ये रिलीज होणार नाही. या अगोदर गीतकार जावेद अख्तर आणि पत्नी शबाना आझमी यांनी कराची मध्ये होणाऱ्या कराची आर्टस् कौन्सिल फेस्टिवल ला भेट देण्यास नकार दिला होता.

मॅडडॉक फिल्म्स निर्मित लुका चुप्पी १ मार्च २०१९ ला तर अर्जुन पटियाला १९ मे ला रिलीज होणार आहे.

लुका चुप्पी मध्ये क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यन ही जोडी झळकणार आहे तर अर्जुन पटियाला मध्ये क्रिती सॅनन बरोबर दिलजीत डोसांझ आहेत.

Related topics