{ Page-Title / Story-Title }

News Marathi

स्वप्नील जोशी मोगरा फुलला साठी ऑफिसला जाणारा सर्वसामान्य पुरुषाच्या भूमिकेत


श्राबनी देवधर ने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशानदार आपल्या जी एस ई ए एम एस या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

Keyur Seta

अभिनेता स्वप्नील जोशी मोगरा फुलला या चित्रपटात आपल्याला एका वेगळ्या रूपात दिसतील. जोशी एक ऑफिसला जाणाऱ्या सर्वसामान्य पुरुषाची भूमिका करणार आहेत.

श्राबनी देवधर ने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशानदार आपल्या जी एस ई ए एम एस या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

वरील फोटोत आपल्याला फॉर्मल ड्रेसमध्ये स्वप्नील जोशी दिसत आहेत. अगणित मुंबैकरां प्रमाणेच ते डोक्यावर हेल्मेट घालून स्कूटरवर बसलेले दिसत आहेत.

जोशींनी आता आपली लव्हरबॉय ही इमेज बदलायची ठरवले आहे असे वाटते.

निर्मात्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या ऑफिशियल प्रेस रिलीजनुसार मोगरा फुलला हा चित्रपट एका अशा व्यक्ती विषयी आहे जो कित्येक वर्ष आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यानंतर शेवटी प्रेमात पडला आहे.

"मोगरा फुलला ची कथा मराठी प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी असेल. आम्हाला आनंद आहे की आम्ही श्राबनी देवधर सारख्या अत्यंत हुशार आणि कष्टाळू दिग्दर्शका बरोबर काम करत आहोत," असं बारन आणि निशानदार ऑफिशियल स्टेटमेण्ट मध्ये म्हणाले.

साट लोट पण सगळं खोटं (२०१५) हा श्राबनी देवधर यांनी दिग्दर्शित केलेला या पूर्वीचा चित्रपट. लपंडाव (१९९३) या चित्रपटासाठी त्या प्रसिद्ध आहेत. लपंडावला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Related topics