News Hindi

केसरी ट्रेलर – या ऍक्शन ने भरपूर आणि रक्तरंजित ट्रेलरमध्ये अक्षय कुमार उठून दिसतात


ट्रेलरमध्ये देशभक्ती आणि जोशपूर्ण संवादामुळे केसरी चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढतो.

Shriram Iyengar

अनुराग सिंग यांचा केसरी ऍक्शन आणि भव्यदिव्य लढाया आणि असंभव साहस याने भरपूर आहे. १८९७ साली सरगढ़ी येथे घडलेल्या २१ शीख विरुद्ध १०,००० अफगाणी सैनिक युद्धावर हा चित्रपट बेतला आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्डा यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

ट्रेलर च्या सुरुवातीला युद्धाच्या प्रारंभाचे दृश्य दाखवली आहेत. किल्य्यांच्या दिशेने चालत येणाऱ्या सैनिकांना पाहून ट्रेलर च्या भव्यतेचा अंदाज येतो.

ट्रेलरमध्ये देशभक्ती आणि काही उत्तम संवादांचा भर आहे. 'ब्रिटिश ऑफिसर एकदा मला म्हणाला की भारतीय डरपोक आहेत. आपण डरपोक नाहीत हे आता आपण त्यांना दाखवायला हवं.' ह्या संवाद मुळे एक देशभक्तीचा जोश येतो.

अफगाणिस्तानच्या एका दूरवरच्या कोन्यात एका शीख रेजिमेंट ला पाठवले आहे. त्या रेजिमेंटचे प्रमुख आहेत हवालदार ईशर सिंग (अक्षय कुमार). त्यांना फक्त तिकडे लक्ष ठेवण्यासाठी पाठवले आहे कारण तो एक शांत भाग आहे. शूरवीर आणि सेक्युलर असे इशर सिंग तिकडे मस्जिद बांधतात. पण अचानक तिकडे अफगाणिस्तान सैनिक हमला करतात.

काही उत्कृष्ट साहस दृश्य आणि गटका या सारखे मार्शल आर्टस् ने भरपूर दृश्यां मुळे हा ट्रेलर प्रभावशाली वाटतो. चित्रपटातली काही दृश्य ज्यात शीख सैनिक अगदी धाडसाने लढत आहेत ती दृश्य चित्रपटा विषयी कुतुहल वाढवतात.

चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे आणि निर्मिती धर्मा प्रोडक्शन्स ने केली आहे. केसरी २१ मार्च ला रिलीज होणार आहे. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review