{ Page-Title / Story-Title }

News Hindi

दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांच्या मिलन टॉकीज चित्रपटाचे पोस्टर रिलीज; १५ मार्च ला होणार चित्रपट रिलीज


अली फजल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्या बरोबर चित्रपटात आशुतोष राणा, संजय मिश्रा, रिचा सिन्हा आणि सिकंदर खेर यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

Our Correspondent

दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांची कित्येक वर्षांपासून अडकलेला चित्रपट मिलन टॉकीज शेवटी १५ मार्च ला रिलीज होणार आहे.

निर्मात्यांनी रिलीज डेट बरोबरच चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले. मिलन टॉकीजची राकेश ओमप्रकाश मेहरांच्या मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर याच्याशी टक्कर असेल.

पोस्टरमध्ये अली फजल आणि श्रद्धा श्रीनाथ कोण्या एका छतावर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या मागे निऑन लाइटमध्ये मिलन टॉकीज असे लिहलेले बोर्ड आहे.

फजल चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका करत आहेत. २०१२-१३ काळातली उत्तर प्रदेश मधली ही कथा आहे जेव्हा छोट्या शहरांमध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्सचा खूप बोलबाला होता.

पी एस चाटवाल यांची कंपनी टॉर्क आणि रिचा सिन्हा यांच्या फिल्मी कीडा प्रोडक्शन्स यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. ओम प्रकाश भट्ट यांचे पर्पल बुल एंटरटेनमेंट ने चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे.

"मला भावलेली गोष्ट म्हणजे हा मुलगा सिनेमागृहांमध्ये प्रोजेक्शनिस्ट चे काम करतो जे अलाहाबाद सारख्या छोट्या शहरात लोकांचे बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. पण आपल्या गर्लफ्रेंडला तो अजूनही प्रपोस करू शकत नाही. जेव्हा सिंगल स्क्रीन हळूहळू मल्टिप्लेक्स मध्ये बदलत होते तेव्हाच्या काळातली ही या दोघांची लव्ह स्टोरी आहे," अली फजल म्हणाले.

दिग्दर्शक धुलिया म्हणाले, "हा माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडणारी एक देशी लव्ह स्टोरी आहे. अली आणि श्रद्धा यांनी उत्कृष्ट काम केले आहे. प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्याची उत्सुकता आहे. आशा आहे की त्यांना हा चित्रपट आवडेल."

निर्माते चाटवाल म्हणाले, "मला आनंद आहे की हा चित्रपट तिग्मांशु धुलिया यांच्या क्रिएटिव्ह मार्गदर्शनाखाली बनला आहे. एक वेगळी लव्ह स्टोरी आणि अत्यंत मनोरंजन करणारा हा चित्रपट १५ मार्च पासून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यांची प्रतिकीर्या जाणून घेण्यास आम्हीसुद्धा उत्सुक आहोत."

पटकथा आणि संवाद धुलिया आणि कमल पांडे यांनी लिहले आहेत.अली फजल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्याबरोबर चित्रपटात आशुतोष राणा, संजय मिश्र, रिचा सिन्हा आणि सिकंदर खेर यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

मिलन टॉकीज बाहेर यायला खूप कालावधी लागला आहे. सर्वात आधी एकता कपूर चित्रपटाची निर्मिती करणार होत्या आणि इम्रान खान यांनी प्रमुख भूमिका करायची होती. पण दोघांनी चित्रपटातून काढता पाय घेतला. नंतर सोनाक्षी सिन्हा ला सुद्धा नायिकेच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते परंतू ते ही सत्यात उतरू शकले नाही.

वरून धवन, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांची सुद्धा नावे चित्रपटाशी जोडली गेली पण शेवटी धुलियांनी फजल आणि श्रद्धा  यांच्याबरोबर हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

फजल यांना शेवटचे आपण हैप्पी भाग जायेगी (२०१८) चित्रपटात पाहिले होते. श्रद्धा श्रीनाथ कन्नड आणि तमिळ इंडस्ट्रीमध्ये ओळखीचा चेहरा आहे. लवकरच त्या तेलगू इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहेत. मिलन टॉकीज हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.

Related topics

Poster review