News Hindi

अमिताभ बच्चन यांचा झुंड चित्रपट २० सप्टेंबर ला रिलीज होईल

Read in: English | Hindi


दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. नागपूर मध्ये विजय बारसे नावाच्या एका निवृत्त क्रीडा शिक्षकाने सुरु केलेल्या स्लम सॉकर प्रोग्रॅम वर हा चित्रपट आधारित आहे.

Our Correspondent

अमिताभ बच्चन अभिनित झुंड २० सप्टेंबर ला रिलीज होणार आहे. निर्माते टी सिरीज ने ट्विटर वरून चित्रपटाची रिलीज ची तारीख अनाऊन्स करताना चित्रपटाचा फर्स्ट लुक सुद्धा रिलीज केला.

पोस्टर मध्ये अमिताभ यांचा चेहरा दिसत नसून फक्त एका माणसाला उत्साही खेळाडूंनी आपल्या खांद्यावर घेतले आहे असे दिसते.

झुंड हा सैराट (२०१६) चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बारसे यांनी नागपूर मध्ये गरीब मुलांसाठी स्लम सॉकर प्रोग्रॅम सुरु केला होता.

टी सिरीज व सविताराज आणि राज हिरेमठ यांच्या तांडव फिल्म्स यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय बारसे यांच्या कथेचे हक्क सविताराज आणि राज यांच्याकडे होते.

चित्रपटात बच्चन फुटबॉल कोच ची भूमिका साकरत आहेत. झुंड हा अमिताभ बच्चन यांच्या साठी खेळावर आधारित असलेला पहिलाच चित्रपट आहे.

Related topics