{ Page-Title / Story-Title }

News Hindi

रणवीर सिंग यांच्या ८३ या चित्रपटात साकिब सलीम साकारणार अमरनाथची भूमिका


साकिब सलीम कबीर खान दिग्दर्शित ८३ या चित्रपटात मोहिंदर 'जिमी' अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे.

Shriram Iyengar

साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार या बातमी नंतर आता भारताच्या ८३ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रवासावर बनणाऱ्या ८३ या चित्रपटाचा स्क्वाड जवळजवळ तयार झाला आहे.

रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत. त्याच बरोबर चित्रपटात ताहीर राज भसीन, चिराग पाटील, एमी विर्क व पंकज त्रिपाठी यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

त्या काळातले जगातल्या सर्वोत्तम बॅटिंग ऑलराऊंडर पैकी एक मोहिंदर 'जिमी' अमरनाथ यांचा भारताच्या ८३ विश्वविजेता होण्यामागे खूप महत्वाचा वाटा होता.

सेमीफायनल मध्ये त्यांची फलंदाजी आणि त्यांनी घेतलेले दोन महत्वाचे विकेट्स (माइक गॅटींग आणि डेविड गोवर) यामुळे त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

त्यांनी फायनल मध्ये श्रीकांत बरोबर महत्वाची पार्टनरशिप करून भारताच्या १८३ धावांमध्ये २६ धावांची भर घातली होती.

गोलंदाजी मध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती – ७ ओव्हर्समध्ये फक्त १२ रन्स देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामुळे भारत वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला हरवून विश्वविजेता बनला.

८३ वर्ल्डकप मधल्या त्यांच्या कामगिरी मुळेच त्यांना १९८४  विसडन टॉप ५ क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये जागा मिळाली होती.

त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल विसडन म्हणाले, "वेस्ट इंडिजच्या खतरनाक गोलंदाजीसमोर ते तग धरून उभे होते म्हणून श्रीकांत विस्फोटक फलंदाजी करू शकले. त्या दोघांनी मिळून त्या सामन्यातली सर्वात मोठी भागीदारी केली. शेवटी त्यांच्या मेडीयम पेस गोलंदाजीचा हुशारीने वापर करत त्यांनी १२ रन्सवर वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना तंबूत धाडले."

साकिब सलीम यांना आपण शेवटचे रेस ३ (२०१८) आणि दिल जंगली (२०१८) या चित्रपटांत पाहिले होते.

८३ कबीर खान दिग्दर्शित चित्रपट १० एप्रिल २०२० ला रिलीज होईल.

Related topics