{ Page-Title / Story-Title }

News Hindi

करण जोहरच्या हाताखालची बाहुली बनण्यापेक्षा आपला कणा ताठ ठेव – कंगना रनौत ने आलिया भटना दिला सल्ला


मणिकर्णिकाचे सह-दिग्दर्शक क्रिश शी वाद झाल्यानंतर आता कंगना ने आलिया भटना त्यांचा चित्रपट पाहायला न आल्याबद्दल काही खडे बोल सुनावले.

Mayur Lookhar

कंगना रनौत आणि मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी चे सह-दिग्दर्शक क्रिश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहे. पण आता कंगनाने आलिया भट वर सुद्धा मणिकर्णिका अजून पाहिला नसल्याने  टीका केली आहे.

गुरुवारी गली बॉय च्या प्रमोशनानिमित्त पत्रकारांशी बोलताना आलियाला कंगना रनौत ने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मणिकर्णिका न पाहिल्याने खडे बोल सुनावले यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली.

मी आशा करते कंगना माझा द्वेष करत नाहीत, किंबहुना मला खात्री आहे त्या माझा द्वेष करत नाहीत. त्यांना नाराज करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. आणि माझं खरंच काही चुकलं असेल तर मी त्यांच्याकडे वयक्तिक माफी मागेन, असे आलिया ने म्हटले.

रनौत यांना मात्र आलियाची ही प्रतिकिया पटली नाही, त्यावर त्यांनी आलिया भटना तीव्र शब्दात सुनावले.

पिंकविला.कॉम शी बोलताना कंगना म्हणाल्या, "मी स्वतः आलियाला विचारले की मणिकर्णिका काय माझी वयक्तिक कॉंट्रोव्हर्सी आहे? संपूर्ण देश या चित्रपटाबद्दल बोलत आहे पण बॉलिवूड मात्र अगदी चिडीचूप आहे."

रनौतने चित्रपटसृष्टीतल्या काही लोकप्रिय आणि बड्या नावांना मणिकर्णिकाच्या विशेष स्क्रिनिंग साठी आमंत्रित केले होते, पण फारच कमी कलाकारांनी स्क्रिनिंगला आपली उपस्थिती दर्शवली, अगदी अमिताभ बच्चन, ज्यांनी चित्रपटासाठी निवेदकाची भूमिका केले होते, त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली नाही.

कंगना यांनी आलिया वर टीका केली की ती करण जोहरच्या हाताखालची बाहुली आहे.

"मी आलियाला विचारले की जर मी उदारमनाने तिच्या विनंतीला मान देत तिचे चित्रपट पाहायला माझी उपस्थिती दर्शवू शकते तर माझा चित्रपट पाहायला ती का आली नाही? मी तिला सल्ला देते की थोडा आपला कणा ताठ ठेवून मणिकर्णिक सारख्या स्त्रीशक्ती आणि देशभक्तीच्या पुरस्कर्ता चित्रपटाला तिने सपोर्ट केले पाहिजे. जर का तिला स्वतःचा आवाजच नसेल आणि करण जोहरच्या हाताखालचे बाहुली बनण्यातच ती धन्यता मानत असेल तर मी तीची उत्तम अभिनेत्रींनमध्ये गणना करूच शकत नाही."

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या राझी पाहण्यासाठी आलिया भटने कंगनाला आमंत्रित केले होते. कंगनाने चित्रपटाची मनापासून स्तुती केली आणि आलियाला क्वीन ऑफ बॉलिवूडची पदवी दिली.

चित्रपटाचे निर्माते करण जोहर होते ज्यांच्याबरोबर नेपोटीझम च्या मुद्द्यावरून कंगनाचा खूप मोठा वाद झाला होता.

आलियाला आमंत्रित करण्यामागे उपकाराची परतफेड करावी हा हेतू नव्हता तर देशाचा गौरव असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली वाहणारा चित्रपट माझ्या सह-कलाकारांनी देखील पाहावा एवढीच इच्छा होती, असे कंगना म्हणाल्या.

Related topics