{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अनुराग कश्यप यांनी आपल्या चित्रपटाचे वूमनिया हे शीर्षक बदलून सांड की आंख ठेवले


वूमनिया या शीर्षकाचे हक्क प्रितीश नंदी कम्युनिकेशन कडे आहेत, म्हणून हे शीर्षक मिळवण्यासाठी अनुराग प्रयत्न करत होते.

Shriram Iyengar

प्रितीश नंदी कम्युनिकेशन यांच्याकडून वूमनिया हे शीर्षक परत मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिल्यानंतर अनुराग कश्यप यांनी आपल्या चित्रपटाचे शीर्षकच बदलण्याचा निर्णय घेतला.

वयाची साठी पार केल्यानंतर नेमबाजी मध्ये पदक मिळवणाऱ्या चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

तुषार हिरानंदानी हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडियावरून चित्रपटाचे नवीन शीर्षक सांड की आंख' ची घोषणा केली.

कश्यप यांनी अगोदर चित्रपटाचे वूमनिया असे नाव ठेवले होते. हे शीर्षक त्यांच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील एका गाण्याच्या ओळीवरून घेतले होते.

परंतू प्रितीश नंदी कम्युनिकेशन यांनी त्यांच्या वेब-सिरीज साठी हे शीर्षक अगोदरच रजिस्टर केले होते. नंतर त्यांनी वेब-सिरीज चे शीर्षक फोर मोर शॉट्स असे ठेवले. तरीही त्यांनी हे शीर्षक कश्यप यांना देण्यास मनाई केली.

सोशल मीडिया वरून अनुराग कश्यप यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. "आता आम्ही प्रितीश नंदी यांना फक्त चित्रपटाच्या शीर्षकासाठी  १ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देण्यास साफ नकार दिला आहे. त्यांनी ते शीर्षक त्यांच्याकडेच ठेवावं आणि त्यातून काही उत्तम निर्माण होईल का याची वाट पाहत बसावी.

तापसी पन्नू यांनी सुद्धा आपला राग सोशल मीडिया वरून व्यक्त केला. "कधी ते आमचे चित्रपट बंद पाडतात तर कधी शीर्षका वरून आमच्याशी भांडतात." तापसी पुढे म्हणाल्या की त्यांनी चित्रपटाचं नाव आता ट्विटरवरून जगजाहीर केलं आहे, "ज्याच्या अंगात दम असेल त्याने आम्हाला रोखून दाखवावं."

प्रत्येक जण त्यांच्या मताशी सहमतच आहे असं नाही. मुल्क (२०१८) चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले त्यांना चित्रपटाचे शीर्षक घेताना अथवा देताना कधी असे वाईट अनुभव नाही आले.

नंदी यांनी जरी काही मदत केली नसली तरी चंद्रो तोमर यांनी ट्विटर वरून चित्रपटाला आपला भक्कम पाठिंबा दर्शवला.

कश्यप आणि हिरानंदानी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर भारताच्या सगळ्यात वृद्ध राष्ट्रीय नेमबाज चॅम्पियन्स आहेत.

Related topics