News Tamil Telugu

द बिग फॅट वेडिंग:दिमाखदार सोहळ्यात सौंदर्या आणि विशेगन यांचा विवाह संपन्न.


आज सकाळी ९ वाजता पार पडलेल्या विवाह सोहळ्यात वधूने ने हिरव्या आणि लाल रंगाची रेशीम साडी परिधान केली होती तर वराने पारंपरिक सफेद आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता.

Haricharan Pudipeddi

तमिळ चित्रपटसृष्टीची बिग फॅट वेडिंग म्हणून वर्णन करावे अश्या दिमाखदार सोहळ्यात फिल्मेकर सौंदर्या रजीनीकांत आणि बिजनेसमॅन विशगन वनांगामुडी यांचे लग्न पार पडले.

गेल्या आठवड्यात सौंदर्याने ट्विटरवर लग्नाची अधिकृत घोषणा केली, "फक्त एक आठवडा. ब्राइड मोड. वेद विशगन सौंदर्या."

या घोषणेनंतर लगेच त्यांच्या फोटोशूटचे काही फोटो सुद्धा वायरल झाले. त्यानंतर जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी लग्नाअगोदर एक छोटे रिसेप्शन आयोजित केले होते.

सोमवारी सकाळी ९ वाजता पार पडलेल्या विवाह सोहळ्यात वधूने हिरव्या आणि लाल रंगाची रेशीम साडी परिधान केली होती तर वराने पारंपरिक सफेद आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता.

लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी सौंदर्याने डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांची गुलाबी आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती तर विशगन यांनी सफेद रंगाचे सुती शर्ट आणि निळ्या रंगाची बॉर्डर असलेली सफेद धोतर परिधान केली होती.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी ते अभिनेते-फिल्मेकर कमल हासन अश्या तमिळ चित्रपटसृष्टीच्या अगदी दिग्गज कलाकारांनी या विवाह सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली. मोहन बाबू, विष्णू मांचू, प्रभू, विक्रम, अदिती राव हैदरी, अँड्रिया जेरमाया आणि मंजिम मोहन ही त्यापैकी काही कलाकारांची नावे.

पी वासू, के एस रवीकुमार, सेल्वराघवन, कस्तुरी राजा यांच्यासारखे फिल्मेकर्स सुद्धा या विवाहाला उपस्थित होते.

लग्नाला ऐश्वर्या रजीनीकांत आणि त्यांचे पती धनुष आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर त्याचबरोबर कुटुंबाचे इतर मंडळी उपस्थित होती.

हे सौंदर्याचे दुसरे लग्न आहे. याअगोदर उद्योगपती अश्विन रवीकुमार यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून त्यांचा वेद नावाचा एक मुलगा देखील आहे.

सौंदर्या आणि अश्विनचे लग्न २०१० मध्ये झाले होते आणि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

विशगन यांचा सुद्धा अगोदर एक घटस्फोट झाला आहे. ऍपेक्स लबोरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या खूप मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचे ते एक्सीक्युटीव्ह डिरेक्टर आहेत. युके च्या ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी मधून मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स सुद्धा पूर्ण केले.

गेल्या वर्षी वंजार उल्लगम या तमिळ थरारपटामधून विशगन यांनी अभिनय क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले. मनोज बिधा यांच्या या चित्रपटात त्यांनी एक महत्वाची भूमिका केली होती.

सौंदर्य यांनी बाबा (2002) आणि संडकोळी (2005) या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्या लवकरच त्यांनी निर्मिती केलेली पुनियीन सेल्वन यावर एक वेब-सिरीज एमएक्स प्लेअर या विडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस वरून लोकांच्या समोर आणणार आहेत. मे ६ एंटरटेनमेंट या त्यांच्या बॅनरखाली बनणाऱ्या वेब-सिरीज च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुरियाप्रताप यांच्यावर आहे.

Related topics