{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अमोल पालेकरांना मुंबईच्या एन जी एम ए आयोजित कार्यक्रमात भाषण करताना रोखले


कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर आपले मनोगत व्यक्त करत होते.

Shriram Iyengar

अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी आपल्या भाषणात एम जी एम ए या संस्थेवर टीका केल्याने नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एन जी एम ए) चे संचालक आणि काही सदस्यांनी त्यांचे भाषण अर्ध्यातच रोखले.

पालेकर यांच्या भाषणामध्ये काहीवेळा व्यत्यय आणला गेला.

प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित इन्साईड द एम्प्टी बॉक्स या प्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते.

ही घटना ८ फेब्रुवारीला घडली. पालेकर त्यांच्या आणि बर्वेंच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत होते. पुढे त्यांनी सांस्कृतिक संचालक मंत्रालय ने कलाकार सल्लागार कमिटी आपल्या ताब्यात घेण्याच्या निर्णयावर टीका केली.

"एन जी एम ए ऑक्टोबर २०१८ पर्यंत कलाकार सल्लागार कमिटीच्या अखत्यारीत इतर कलाकारांसाठी प्रदर्शन भरवत असे, परंतु आता ही कमिटी बरखास्त करण्यात आली आहे," पालेकर म्हणाले.

द वायर.कॉम या वेबसाइट ने पालेकरांचे संपूर्ण भाषण प्रकाशित केले. त्यात पालेकर म्हणाले, "उपस्थितांपैकी बहुतेकांना हे माहित नसावे, कलाकारांच्या सल्लागार कमिटी ने स्वतः अयोजीत केलेला हा कदाचित शेवटचा शो असावा कारण यापुढचे सर्व शो हे सरकारचे एजेंट अथवा कोणा सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे फक्त एकाच विचारसरणीला मदत करणारे शो आयोजित केले जातील. नोव्हेंबर २०१८ पासून १३ सदस्यांच्या या कमिटीच्या मुंबई आणि बंगलोर इथल्या दोन्ही शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत."

सिनेस्तान.कॉम कडे असलेल्या विडिओ मध्ये आपल्याला दिसू शकते की प्रदर्शनाच्या क्युरेटर जेसल ठक्कर अमोल पालकरांना भाषण करताना थांबवून त्यांना फक्त प्रभाकर बर्वेंबद्दल बोलण्यास सांगत होत्या.

त्यावर पालेकरांनी त्यांना विचारले, "तुम्ही मला बोलण्यापासून रोखून माझ्या भाषणावर सेन्सरशिप लावत आहात का?" 

ते पुढे बोलतात, "नुकत्याच एका समारंभात नयनतारा सहगल यांना भाषण करण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतू त्यांच्या भाषणात त्यांनी आताच्या सामाजिक स्थितीवर टीका केली म्हणून त्यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले. तुम्ही देखील माझे भाषण थांबवून तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात का? मी बोलू नये असे तुम्हाला वाटत असेल तर मी माझे भाषण थांबवतो."

कार्यक्रमाच्या संचालिका अनिता रूपवर्तरम यांनी पालेकरांवर टीका केली. त्या म्हणाल्या, "आम्ही आमचे सर्व समस्या मांडल्या आहेत, आणि तरीही एन जी एम ए ही एक सरकारी संस्था आहे याची तुम्ही भान ठेवायला हवे."

जेव्हा पालेकर म्हणाले की भाषण अर्ध्यातच थांबवले नसते तर पुढे ते सांस्कृतिक मंत्रालयाच्या उदारतेविषयी देखील बोलणार होते त्यावर अनिता म्हणाल्या, "असं हातचं राखून केलेलं कौतुक आम्हाला नको, धन्यवाद."

प्रसिद्ध कलाकार आणि आता बरखास्त केलेल्या सल्लागार कमिटीचे चेअरमन सुहास बहुलकर यांनी प्रतिक्रिया दिली की "मतभेद नेहमीच असतात. संवाद व्हायलाच हवा अगदी युक्तिवाद देखील व्हावा पण, आपण हे विसरता कामा नये आज आपण बर्वें आणि त्यांचे काम यावर बोलायला येथे जमलो आहोत."

पालेकरांशी सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू ते या विषयावर बोलण्यास उत्सुक नव्हते.

Related topics

Censorship Intolerance