{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अक्षय कुमार ह्यांचे कबीर सिंह वर झालेल्या टीकेवर मत – एक व्यक्तिरेखा, त्याला जास्त गांभीर्याने घेऊन नये


अक्षय ह्यांनी शाहिद कपूर ह्यांची पाठराखण केली आणि कसे सर्वच कलाकारांना अशी पात्र साकारल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागते हे सांगितले.

Keyur Seta

शाहिद कपूर ह्यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंह ने भारतीय बॉक्स ऑफिस दणाणून सोडले. कियारा अडवाणी अभिनित आणि संदीप वंगा दिग्दर्शित या चित्रपटाने रु२७५ कोटी पेक्षा अधिक कमाई केली आहे. या वर्षात सर्वात जास्त कमाई करण्याचा मान देखील याच चित्रपटाला मिळाला आहे. हा चित्रपट इतकी कमाई करेल असं कोणालाच वाटले नव्हते.

कबीर सिंहला काही समीक्षक, मीडिया आणि प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. हा चित्रपट पुरुषसत्ताक प्रवृत्तीला बढावा देतो असा त्यांचा आरोप होता. कपूरला सुद्धा टीकेचा धनी व्हावे लागले.

मिशन मंगल (२०१९) च्या प्रमोशनदरम्यान इंटरव्यू देत असताना अक्षय कुमार ह्यांना त्यांचे मत विचारण्यात आले. अक्षय ह्यांनी म्हटले की ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन यामधला फरक करायला यायला हवं. "ही एक व्यक्तिरेखा आहे, त्याला जास्त गांभीर्याने घेऊन नये," असं ते म्हणाले.

त्यांनी स्वतःच्या आयुष्यातले एक उदाहरण दिले. "मी काही चित्रपटांमध्ये खलनायक साकारला आहे याचा अर्थ मी पण दुष्ट आहे असा होत नाही." अब्बास-मस्तान दिग्दर्शित अजनबी (२००१) मध्ये  त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती.

अक्षय पुढे म्हणाले, "गुलशन ग्रोव्हर सतत खलनायकाची भूमिका साकारतात याचा अर्थ ते दुष्ट व्यक्ती आहेत असा होत नाही." ग्रोव्हर अक्षय कुमार ह्यांच्या सूर्यवंशी (२०२०) मध्ये परत खलनायकाची भूमिका साकारत आहेत. रोहित शेट्टी ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Related topics