News Hindi

बॉक्स ऑफिस – जजमेंटल है क्या ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद, पहिल्या आठवड्यात कमवले फक्त रु२७.४० कोटी


ह्रितिक रोशन अभिनित सुपर ३० ने मात्र चांगली कमाई केली आणि चित्रपटगृहांमध्ये आपला तिसरा आठवडा पूर्ण केला.

Our Correspondent

कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला जजमेंटल है क्या ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे. प्रकाश कोवेल्मुडी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात रु२७.४० कोटी कमवले आहेत.

जजमेंटल है क्या ने पहिल्याच वीकेंडला फक्त रु१९.२५ कोटी कमवले होते आणि त्यानंतरच्या सोमवारी चित्रपट फक्त रु२.२५ कोटी कमवू शकला. त्यानंतर दिवसागणिक चित्रपटाची कमाई घसरू लागली.

काही चित्रपट व्यवसाय विश्लेषकांच्या मते या चित्रपटाचे बजेट रु३०-३५ कोटी इतके होते. जजमेंटल है क्या साठी एकमेव चांगली गोष्ट म्हणजे या शुक्रवारी कोणता मोठा हिंदी चित्रपट रिलीज झाला नाही, पण त्याचसोबत एक वाईट बातमी सुद्धा आहे ती म्हणजे फास्ट अँड फ्युरियस प्रेसेंट: हॉब्स अँड शॉ बद्दल प्रेक्षांमध्ये उत्सुकता आहे.

जजमेंटल है क्या सोबत रिलीज झालेला क्रिती सॅनन आणि दिलजीत डोसांझ यांचा अर्जुन पटियाला ने संपूर्ण आठवड्यात फक्त रु६.२० कोटीची कमाई केली.

दुसरीकडे ह्रितिक रोशन अभिनित सुपर ३० ने तिसऱ्या आठवड्यात देखील रु१७.८५ कोटीची कमाई केली. विकास बहाल यांनी दिग्दर्शित केलेला गणितज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित सुपर ३० ने आतापर्यंत रु१३१.२८ कोटी कमावले आहेत.

लायन किंग ने दुसऱ्या आठवड्यात रु४४ कोटीची कमाई केली असून चित्रपटाची एकूण कमाई आता रु१२४.९४ कोटी इतकी झाली आहे.

Related topics