{ Page-Title / Story-Title }

News Hindi Marathi

'ढगाला लागली कळं' या मराठी गाण्याचे रीमिक्स आयुष्मान खुराणा यांच्या ड्रीम गर्ल मध्ये


रितेश देशमुख सुद्धा या गाण्यात पाहुण्या भूमिकेत दिसतील.

Our Correspondent

जुनी गाणी रीमेक करण्याचा ट्रेंड आपल्याला आयुष्मान खुराणा आणि नुश्रत भरुचा अभिनित ड्रीम गर्ल मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. यावेळी निर्माते एका मराठी गाण्याचा रीमेक करणार आहेत. दादा कोंडकेंच्या 'ढगाला लागली कळं' या गाण्याच्या रीमेकवर हे दोन लीड ऍक्टर्स थिरकताना दिसतील.

रितेश देशमुख सुद्धा या गाण्यात पाहुण्या भूमिकेत दिसतील. मुंबई मिररशी बोलताना त्यांनी सांगितले, "'ढगाला लागली' हे मराठीतील अतिशय लोकप्रिय गाणे आहे. दादा कोंडकेंच्या गाण्यात काम करायला मिळणार याच साठी मी होकार दिला. आयुष्मान आणि नुश्रत दोघेही उत्तम डान्सर आणि कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय याचा सुद्धा आनंद आहे."

नुकतेच या गाण्याचे शूटिंग पूर्ण झाले. ज्योतीका टांगरी यांनी गाण्यातील मराठी ओळी गायल्या असून गाण्याचे संगीतकार मीत ब्रदर्स यांनी हिंदी ओळी गायल्या आहेत. गणेश आचार्य यांनी गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी मुंबई मीररला रितेश देशमुख ह्यांना या गाण्याचा भाग होण्यासाठी कसे तयार केले हे सांगितले. "मी रितेशसोबत यादों की बारात नावाचा टॉक शो केला होता. आम्ही खूप आधीपासून एकमेकाला ओळखतो. जेव्हा मी रितेशकडे या गाण्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ते लगेच तयार झाले."

१३ सप्टेंबरला ड्रीम गर्ल रिलीज होईल. खाली बोट लावीन तिथं गुदगुल्या (१९७८) या चित्रपटातील हे ओरिजिनल गाणे पहा.

Related topics