{ Page-Title / Story-Title }

News Marathi

मिरांडा हाऊस ट्रेलर – उत्सुकता वाढवणारा ट्रेलर


या थरारपटात मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Keyur Seta

आजकाल ट्रेलरमध्ये चित्रपटाची संपूर्ण कथाच सांगून टाकली जाते. पण हा ट्रेलर फक्त ३३ सेकंड्स चा असल्यामुळे सुदैवाने ट्रेलरमध्ये असे काहीच घडत नाही.

त्यामुळे चित्रपटाच्या कथेचा बिल्कुल अंदाज येत नाही. तरीही ट्रेलर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

मोहिनी नावाच्या स्त्री ने पल्लवी सुभाष च्या पात्रावर समर नावाच्या व्यक्तीला मारण्याची जबाबदारी सोपवली आहे. तिची भेट एका पुरुषाशी होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोहिनीने त्या पुरुषाला देखील समर ला मारण्यास सांगितले आहे. मिलिंद गुणाजी ने समर ची भूमिका साकारली आहे असे ट्रेलर पाहून वाटते.

मिरांडा हाऊस हा एक क्राइम थ्रिलर आहे. ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रेसूल पूकुट्टी ने या चित्रपटाचे साऊंड डिजाइन केले आहे. राजेंद्र तलक चा या अगोदरचा चित्रपट अ रेनी डे (२०१४) चे साऊंड डिजाइन सुद्धा रेसूल पूकुट्टी यांनीच केले होते.

पल्लवी सुभाष ने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या घर होतं मेणाचं या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पुनःपदार्पण केले. त्यांनी कसम से (२००८) आणि महाभारत (२०१३) या सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे.

कामत चा हा पहिलाच चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेत अभिनय केला आहे.

मिरांडा हाऊस १९ एप्रिल ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का हे आम्हाला कळवा.

 

Related topics

Trailer review