{ Page-Title / Story-Title }

News Marathi

बालक पालक ख्यातीचे प्रथमेश परब टकाटक मध्ये प्रमुख भूमिकेत


मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित या चित्रपटात रितिका श्रोत्री नायिकेच्या भूमिकेत दिसणार.

Keyur Seta

मिलिंद कवडे यांच्या पुढील चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री रितिका श्रोत्री यांची जोडी दिसेल. पर्पल बुल एंटरटेनमेंट, व्ही पटके फिल्म्स आणि गाववाला क्रिएशन्स ने मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाचे टायटल पोस्टर रिलीज केले. पोस्टरवर दिसणाऱ्या शिर्षकामध्ये मोठ्या कल्पकतेने हार्टचा आकार दाखवला आहे, यावरून हा एक रोमँटिक आणि विनोदी चित्रपट असेल असा अंदाज बांधता येतो.

परब त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंग मुळे चर्चेत आला. रवी जाधव दिग्दर्शित बालक-पालक (२०१२) मध्ये आपल्या मित्रांना पॉर्न बघायला प्रोत्साहित करणाऱ्या मुलाची भूमिका त्याने निभावली होती.

रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास (२०१४) मधल्या अभिनयामुळे तो प्रसिद्ध झाला. टाईमपास मध्ये केतकी माटेगावकर नायिकेच्या भूमिकेत होत्या.

दृश्यम (२०१५), उर्फी (२०१५), लालबागची राणी (२०१६), खजूर पे अटके (२०१८) आणि झिपऱ्या (२०१८) या चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला आहे.

श्रोत्री ने स्लॅमबूक (२०१५) आणि बॉईज (२०१७) या चित्रपटात चरित्र भूमिका केल्या होत्या. बकेट लिस्ट (२०१८) मध्ये त्यांनी माधुरी दीक्षित नेनेंच्या मुलीची भूमिका केली होती.

टकाटक २८ जून ला रिलीज होईल.

Related topics

Poster review