News Hindi

ब्लँक टीजर – या उत्कंठावर्धक चित्रपटामधून करण कापडिया अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार


बेहझाद खंबाटा लिखित-दिग्दर्शित या चित्रपटात करण कापडिया सुइसायड बॉमर ची भूमिका साकारणार.

Sonal Pandya

सनी देओलच्या धीरगंभीर आवाजातील 'आतंकवादाचा कोणताच धर्म नसतो, पैसा हाच त्याचा धर्म असतो' या वाक्याने टीजरला सुरुवात होते.

ब्लँकच्या फर्स्ट लुक मध्ये दिवंगत कॉश्च्युम डिझायनर सिम्पल यांचा मुलगा आणि डिम्पल कापडिया यांचा पुतण्या करण कापडिया ला इंट्रोड्यूस केले आहे.

करण कापडिया सुइसायड बॉमरच्या भूमिकेत आहे ज्याची स्मरणशक्ती गेली आहे. आशा आहे की करण ही कठीण भूमिका पेलवू शकेल.

बेहझाद खंबाटा लिखित-दिग्दर्शित हा थरारपट ३ मे ला रिलीज होईल. इशिता दत्त सुद्धा चित्रपटात आहेत आणि ४ एप्रिल ला रिलीज होणाऱ्या ट्रेलरध्ये त्या आपल्याला दिसतील. टीजर खाली पहा.

Related topics

Teaser review