मिलिंद पाटील दिग्दर्शित या चित्रपटात अशोक धागे आणि शीतल अहिरराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मराठी चित्रपट H2O पाणीटंचाईवर भाष्य करतो
मुंबई - 08 Apr 2019 15:53 IST
Updated : 15:59 IST


Keyur Seta
H2O या शीर्षकावरून चित्रपटाच्या विषयाचा अंदाज येतो. चित्रपटात आपल्याला दिसते की एका गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जी एस फिल्म्स निर्मित H2O हा मिलिंद पाटील यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.
आपल्या गावातल्या पाण्याच्या अभावामुळे चिंतीत असलेला एक सुशिक्षित तरुण आपल्या मित्रांसोबत पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. पण गावातल्या एका नेत्याच्या मुलाच्या विरोधाला सामोरे जाण्यासाठी तो सुद्धा राजकारणात उतरतो. तो शीतल अहिरराव ने साकारलेल्या मुलीच्या प्रेमात आहे.
चित्रपटाचा विषय खूपच महत्वाचा असला तरी चित्रपटाचा ट्रेलर मात्र आपली निराशा करतो. कुठचेही सीन्स आणि गाणी यांचे मिश्रण करून बनवलेल्या या ट्रेलरमध्ये अजिबात सुसंगतता नाही.
ट्रेलरच्या सुरुवातीला असे वाटते की बास्केटबॉल या खेळाभोवती फिरणारी स्पोर्ट्स फिल्म आहे. पण नंतर कथा वेगळेच वळण घेते. असं करणे टाळायला हवे होते.
H2O 12 एप्रिल ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.