{ Page-Title / Story-Title }

News Hindi

ब्लँक ट्रेलर – करण कापडियांच्या छातीवरील बॉम अकार्यक्षम करण्याच्या प्रयत्नात सनी देओल


नवोदित अभिनेता कापडिया आपली स्मरणशक्ती गमावलेल्या सुइसायड बॉमरच्या भूमिकेत आहे. त्याच्या छातीवर तो बॉम कोणी चिकटवला याची त्याला कल्पना नाही.

सनी देओल आणि करण कपाडिया ब्लँक मध्ये.

Mayur Lookhar

सनी देओल पुन्हा एकदा ऍक्शनपटात दिसणार. ब्लँक या ऍक्शनपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक अनोखे आहे पण चित्रपटाच्या कथानकाशी नक्कीच मेळ खाते.

दिवंगत कॉश्च्युम डिझायनर सिम्पल कापडियाचा मुलगा करण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. कापडिया आपली स्मरणशक्ती गमावलेल्या सुइसायड बॉमरच्या भूमिकेत आहे. त्याच्या छातीवर तो बॉम कोणी चिकटवला याची त्याला कल्पना नाही.

सनी देओल अँटी-टेरर तुकडीचे प्रमुख आहेत. खूप मोठी दुर्घटना टाळण्यासाठी करण च्या छातीवर तो बॉम कोणी लावला याचा ते शोध घेत आहेत. करणची स्मरणशक्ती गेली आहे हा त्यातला सर्वात मोठा अडथळा आहे.

ब्लँक हा बेहजाद खंबाटा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. जेसन बॉर्न या हॉलिवूड फ्रँचाइजमध्ये सुद्धा हीच संकल्पना आहे.

चित्रपटाचे कथानक इंटरेस्टिंग असले तरी ट्रेलर मात्र आपली उत्सुकता वाढवण्यात अपयशी ठरला आहे. ६२ वर्षाचे देओल आता खूप कठीण ऍक्शन करू शकत नाहीत.

ट्रेलर पाहता करण कापडिया अभिनेता म्हणून जास्त प्रभाव पाडू शकले नाहीत. जमील खान टिपिकल मुल्ला च्या भूमिकेत दिसतात. एक-दोन ऍक्शन सीन्स व्यतिरिक्त इशिता दत्त यांच्या वाट्याला एकपण संवाद आला नाही.

ब्लँक ३ मे ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review