News Hindi

'हौली हौली' गाणे: तब्बू आणि अजय देवगण रकुल प्रीत बरोबर या गाण्यात दिसतात


गॅरी संधूंचे ओरिजिनल पंजाबी गाण्याला तनिष्क बागचींनी नेहा कक्कर आणि संधूंच्या आवाजात नवीन तडका दिला आहे.

Shriram Iyengar

तब्बू कितीही उत्कृष्ट अभिनेत्री असल्या तरी त्या कधीच नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध नव्हत्या. पण दे दे प्यार दे मधल्या 'हौली हौली' या गाण्यात अजय देवगणचे लक्ष वेधून घेण्यासाठी रकुल प्रीत सिंहची बरोबरी करायचा तब्बू प्रयत्न करत आहेत.

'हौली हौली' हे एक टिपिकल पंजाबी गाणे आहे. गाण्याला चांगला रिदम आहे. गॅरी संधूंचे पंजाबी गाणे 'ये बेबी' चा हा रीमेक आहे.

काही निवडक स्टेप्स वगळता सर्व डान्स करण्याची जबाबदारी या गाण्यात रकुल प्रीत सिंह वरच दिली आहे. एक प्रकारे ही चांगलीच गोष्ट आहे कारण त्यामुळे अजय आणि तब्बू नृत्य करण्यात माहीर नाहीत ही गोष्ट लपवता येते.

गाण्याची कोरिओग्राफी साधी आहे आणि रकुल प्रीतच जास्त नृत्य करताना दिसतात.

तनिष्क बागचींनी पंजाबी बीट्स आणि ई डी एम यांचं मिक्स करून गाण्याला संगीत दिले आहे. नेहा कक्कर आणि गॅरी संधू यांनी गाण्याला आवाज दिला आहे. संधू आणि बागची यांनी लोकांना अधिक पसंत पडावं या साठी ओरिजिनल गाण्याची स्पीड वाढवली आहे, पण त्यामुळे गाण्याचा गोडवा आणि सिम्पलीसिटी कमी होते.

टी-सिरीज सध्या आपल्या प्रत्येक नवीन अल्बम मध्ये रिमिक्स गाणी टाकत आहे. अकीव अली दिग्दर्शित दे दे प्यार दे १७ मे ला रिलीज होईल. खाली गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.

Related topics

Song review