आयटम नंबर सारखेच असलेले हे गाणे श्रेया घोषाल, नकाश अजीज यांनी गायले आहे.
भारत चे नवीन गाणे: सर्कस चा स्टेज, सलमान आणि दिशा चे 'स्लो मोशन' ठुमके
मुंबई - 29 Apr 2019 18:25 IST


Sonal Pandya
भारत सिनेमात १९६४ मध्ये द ग्रेट रशियन सर्कस मध्ये सलमान खान मौत का कुआ मध्ये खतरनाक स्टंट करताना दिसतात. या गाण्यात सुद्धा आपल्याला हा अनुभव घेता येईल.
भारत मध्ये दिशा पटनी ट्रपीज आर्टिस्ट राधा म्हणून दिसतात. आपल्या वयापेक्षा खूपच तरुण दिसणारे सलमान खान या गाण्यात लग्नासाठी मागणी घालत आहेत.
विशाल-शेखर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. सुनील ग्रोव्हर आणि सलमान खान निशाण्यावर चाकू फेकण्याचे कौशल्य दाखवत आहेत.
गीतकार इर्शाद कामिल ने 'आज डूब जाऊं तेरे आँखों के ओशन मे, स्लो मोशन मे' असे मजेदार शब्द लिहले आहेत. आयटम नंबर सारखेच असलेले हे गाणे श्रेया घोषाल, नकाश अजीज यांनी गायले आहे.
वैभवी मर्चंट यांचे नृत्यदिग्दर्शन पाहून आपल्याला सैलाब (१९९०) मधील माधुरी दीक्षित वर चित्रित 'हमको आजकल है इंतेजार' या गाण्याची आठवण येते. गाणे मनोरंजक आहे. सलमान आणि दिशा यांची जोडी या गाण्यात शोभून दिसते.
अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत ५ जून ला ईद च्या दिवशी रिलीज होईल. गाणे खाली पहा.