{ Page-Title / Story-Title }

News Hindi

स्टुडन्ट ऑफ द इयर २: मुंबई दिल्ली दि कुडियां हे कलरफुल गाणे ऐकायला मात्र साधारणच


देव नेगी, पायल देव आणि विशाल दादलानी यांनी गायलेले हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे.

Sonal Pandya

स्टुडन्ट ऑफ द इयर २ मधल्या 'मुंबई दिल्ली दि कुडियां' गाण्यात टायगर श्रॉफ यांचे पाय जमिनीवर टिकतच नाहीत. अनन्या पांडे आणि तारा सुटारीया यांच्या पेक्षा टायगर श्रॉफ खूप उत्तम नृत्य करतात.

गाणे खूप कलरफुल आहे. रेमो डिसूजा यांनी गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. स्लो मोशन ने गाण्याची सुरुवात होते आणि मग डान्स ला सुरवात होते. संगीतकार विशाल-शेखर ने मात्र गाण्यात आपली निराशाच केली आहे.

विशाल दादलानी यांच्या आवाजातल्या रॅप ने गाण्याची सुरुवात होते आणि मग देव नेगी टायगर श्रॉफ यांना आवाज देतात. पायल देव यांनी अनन्या आणि तारा या दोघींना गाण्यात आवाज दिला आहे.

गाण्याचा टोन खोडकर आहे पण वायु यांच्या शब्दातून हे जाणवत नाही. खरंतर गाण्यात एकच बीट आणि तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरले आहेत.

खूप भव्य अश्या लग्न समारंभाच्या वेळी हे गाणे घडते. पण ते इथे हे सर्वजण का नाचत आहेत हे मात्र आपल्याला कळत नाही. रोहन (टायगर श्रॉफ) याचा मिया (सुटारीया) व श्रेया (पांडे) या दोघीं बरोबर किसिंग दाखवून चित्रपटातला प्रेमाचा त्रिकोण गाण्यात सुद्धा दाखवलेला आहे.

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर २ १० मे ला रिलीज होईल. खाली गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Song review