News Marathi

बाळा ट्रेलर – हास्यास्पद स्पोर्ट्स फिल्म


विक्रम गोखले, उपेंद्र लिमये यांच्या सारखे काही उत्कृष्ट नट या चित्रपटात आहेत.

Keyur Seta

माणूस एक माती (२०१७), नगरसेवक एक नायक (२०१७), ट्रकभर स्वप्न (२०१८), आम्ही बेफिकीर (२०१९) यांसारखे काही हास्यास्पद चित्रपट गेल्या काही वर्षात मराठीत येऊन गेले. आता सचिंद्र शर्मा यांचा बाळा सुद्धा याच यादीत सामील होणार आहे असे वाटते.

ट्रेलरमध्ये आपल्याला दिसते की एका लहान मुलाला क्रिकेटर बनायचे आहे. मराठीमध्ये सध्या अशाच विषयावरचे काही चित्रपट येऊन गेले आहेत.

ट्रेलरमध्ये चित्रपटातले कोणतेही सीन्स काहीही विचार न करता टाकले आहेत. असे वाटते की एडिटरला फारच घाई होती काम उरकायची.

मुलाचं क्रिकेट खेळणं त्याचे वडिल (उपेंद्र लिमये) यांना पसंत नाही. आपल्याला वडिलांचे त्यांचे वडिल (विक्रम गोखले) यांच्या सोबत असलेले नाते सुद्धा ट्रेलरमध्ये दिसते. मुलाचं घरातून पळून जाणं, बाहेर नवीन मित्र बनवणं, वेश्या, ऍक्सीडेन्ट, विठ्ठलाची भक्ती या सर्व गोष्टी आपल्याला या ट्रेलरमध्ये दिसतात.

यश अँड राज एंटरटेनमेंट ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विक्रम गोखले, उपेंद्र लिमये सारखे दिग्गज अभिनेत्यांनी या चित्रपटाला होकार दिला. क्रांती रेडकर सुद्धा या चित्रपटात आहेत.

बाळा ३ मे ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही हा चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review