{ Page-Title / Story-Title }

News Marathi

रंपाट मधल्या 'ये ना गावरान मैना' गाण्यात अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी गावाकडच्या पेहरावात


बेला शेंडे आणि रोहित राऊत त्यांच्या आवाजाने गाण्याला एका वेगळ्या खटयाळ उंचीवर घेऊन जातात.

Keyur Seta

रवी जाधवांच्या रंपाटची कथा सोलापूर जिल्ह्यात घडते. चित्रपटात अभिनय बर्डे आणि कश्मिरा परदेशी प्रमुख भूमिकेत आहेत. मिथुन आणि मुन्नी अशी त्यांच्या पात्रांची नावे आहेत. त्यांना मोठे फिल्म स्टार व्हायचं आहे.

'ये ना गावरान मैना' गाण्यात सोलापुरी फ्लेवर पाहायला मिळतो. छोट्या खेड्यांमध्ये उत्सवां दरम्यान आपल्याला जशी गाणी ऐकायला मिळतात तसे हे गाणे आहे.

प्रोडक्शन डिजाइन आणि कॉश्च्युम सुद्धा उच्च दर्जाचे झाले आहेत. पण नृत्य दिग्दर्शनाने मात्र मार खालेला आहे. डान्स स्टेप्स मध्ये तोचतोचपणा दिसतो. परदेशी आणि बेर्डे यांना त्यांच्या वयापेक्षा मोठं दाखवलं आहे कारण ते या गाण्यात त्यांच्या वया पेक्षा मोठ्या गावच्या जोडप्याची भूमिका साकारत आहेत.

संगीतकार चिनार-महेश यांनी संपूर्ण गाण्यात एकाच पद्धतीचे संगीत वापरले आहे. बेला शेंडे आणि रोहित राऊत त्यांच्या आवाजाने गाण्याला एका वेगळ्या खटयाळ उंचीवर घेऊन जातात.

अभिनय बेर्डे ने या अगोदर ती सध्या काय करते (२०१७) आणि अशी ही आशिकी (२०१९) मध्ये काम केले आहे. परदेशी ने @नर्तनसाला या तेलगू चित्रपटात काम केले आहे. रंपाट हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

१७ मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. खाली गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Song review