News Hindi

कंगना रनौत एका खऱ्या घटनेवर आधारित ऍक्शन चित्रपट दिग्दर्शित करणार


लवकरच चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले जाईल.

Our Correspondent

मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी मध्ये कंगना रनौत ने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका तर केली होतीच, त्याचबरोबर त्यांनी चित्रपटाचे सह-दिग्दर्शन सुद्धा केले होते. आता त्या लवकरच अजून एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

एका अधिकृत विधानानुसार कंगना रनौत लवकरच एका खऱ्या घटनेवर आधारित ऍक्शन चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

"मी लवकरच माझ्या पुढील चित्रपटाची घोषणा करणार आहे. हा एक ऍक्शन ड्रामा असून मोठ्या स्केल वर हा चित्रपट बनवणार आहोत. स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाली आहे आणि लवकरच फोटोशूट करून आम्ही चित्रपटाचे पोस्टर्स सुद्धा रिलीज करू," असं रनौत म्हणाल्या.

रनौत यांना खात्री आहे की त्या चित्रपटासाठी मोठा बजेट मिळवतील. "अजून खूप कथा सांगायच्या आहेत आणि आजकाल अभिनेत्रींचे चित्रपटसुद्धा चांगले पैसे कमवतात. मणिकर्णिकाच्या यशामुळे मी अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून समाधानी आहे. दिग्दर्शक म्हणून माझ्या पुढील चित्रपटावर काम सुरु करायला ही योग्य वेळ आहे," असं रनौत म्हणाल्या.

रनौत आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला मेंटल है क्या हा चित्रपट सुद्धा लवकरच रिलीज होईल. कंगना रनौत भविष्यात पंगा आणि जयललिता वर बनणारा जीवनपट या दोन चित्रपटातसुद्धा काम करणार आहेत.

Related topics