News Hindi Telugu

कबीर सिंह टीजर – शाहिद कपूर प्रेमात पडलेल्या विद्रोही वृत्तीच्या डॉक्टरच्या भूमिकेत


संदीप रेड्डी वंगा दिद्गर्शित कबीर सिंह २०१७ चा हिट तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी चा रीमेक आहे.

Shriram Iyengar

संदीप रेड्डी वंगा दिद्गर्शित कबीर सिंह च्या टीजर वरून वाटते की चित्रपट २०१७ चा तेलगू ओरिजिनल अर्जुन रेड्डी ची आत्मा पकडण्यात यशस्वी झालेला आहे. टीजर मध्ये शाहिद कपूर माचो अवतारात दिसत आहेत.

टीजर च्या सुरवातीला आपल्याला कबीर सिंह च्या पात्राची ओळख करून दिली जाते. कबीर राजवीर सिंह दिल्ली मेडिकल कॉलेज मधून उत्तीर्ण झालेला आतापर्यंत चा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होता. ओरिजिनल चित्रपटाप्रमाणे या चित्रपटात सुद्धा प्रेमात पडल्यानंतर दारू, ड्रग्स च्या आहारी गेलेला डॉक्टर दाखवला आहे. टीजरमध्ये स्वतःच्या रागावर ताबा ठेवण्यात असफल ठरलेला कबीर सिंह आपल्याला दिसतो.

खऱ्या आयुष्यात दारू न पिणाऱ्या आणि सिगारेट न ओढणारे शाहिद कपूर या टीजरमध्ये मात्र विस्की पिताना आणि सिगारेट ओढताना दिसतात.

किआरा अडवाणी सुद्धा टीजरमध्ये दिसतात. त्या कबीर सिंह च्या प्रेयसीच्या भूमिकेत आहेत.

संदीप वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विजय देवराकोंडा अभिनित ओरिजिनल तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी चे दिग्दर्शन सुद्धा वंगा यांनीच केले होते.

२१ जून २०१९ ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Teaser review